loader
Breaking News
Breaking News
Foto

श्री. प्रवीण शिंदे मित्र मंडळ कोंढे आयोजित गणपती मखर सजावट स्पर्धेत ‘इंदुलकर परिवाराचा राजा’ प्रथम!

दापोली(प्रतिनिधी)- श्री. प्रवीण शिंदे मित्र मंडळ आयोजित कोंढे गाव मर्यादित गणपती मखर सजावट स्पर्धेला यावर्षी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत एकूण २६ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. गणपती मखर स्पर्धेत कोंढे येथील इंदुलकर परिवाराच्या राजा चा प्रथम क्रमांक तर व्दितीय क्रमांकाचा मान काते परिवाराला घोषीत करण्यात आला तसेच तृतीय क्रमांक बोबले परिवाराच्या राजा मकराने पटकावला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दापोली तालुक्यातील कोंढे येथील श्री. प्रविण शिंदे मित्र मंडळ आयोजित श्री. गणपती मखर स्पर्धेत उतरलेल्या इंदुलकर परिवाराने मखर सजावटीतून ग्रामीण संस्कृतीचे कलात्मक दर्शन घडविले. होते त्यांना प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले तर काते परिवाराने कोकणच्या पारंपरिक संस्कृतीशी नाते सांगणारी बैलगाडीची जोडी आणि त्यावर विराजमान गणराया ही संकल्पना साकारली होती. तसेच बोबले परिवाराने ग्रामीण घराची संकल्पना मखरातून प्रभावीपणे मांडली.

टाइम्स स्पेशल

अशा या स्पर्धेचे परीक्षण अरविंद मांडवकर यांनी केले. विजेत्यांना अनुक्रमे डिनर सेट, टेबल फॅन आणि कुकर अशी पारितोषिके देण्यात आली. ही पारितोषिके शुभ्र मोबाईल, दापोली-पुणे, विनेश विजय पाटील व विशाल विजय पाटील यांनी दिली. स्पर्धेत सहभागी गणेशभक्तांना प्रोत्साहनपर भेटवस्तू प्रभाकर शिंदे व विश्वनाथ दळवी यांनी वडिलांच्या स्मरणार्थ दिल्या. दापोली तालुक्यातील कोंढे येथील अनुराग संतोष घोडेराव यांच्या निवासस्थानी झालेल्या या बक्षीस वितरण कार्यक्रमाला कोंढे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, प्रवीण शिंदे मित्र मंडळाचे प्रवीण शिंदे, माजी सरपंच राजाराम घोडेराव, माजी सरपंच विजय शिगवण, कोंढे शाखाप्रमुख जयवंत राजीवले, मुंबईचे कार्यकर्ते संदेश गोरिवले, कृष्णा भुवड, दत्ताराम गोरिवले, डॉ. विनोद घोडेराव, विनोद दळवी, बाळा कदम, अमोल घोडेराव, प्रशांत पाते, महेंद्र रहाटे, प्रभाकर कदम आदी. उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg