loader
Breaking News
Breaking News
Foto

कुणकेश्वर किनारपट्टी स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिक, अधिकारी-कर्मचाऱ्यांनी एकत्र येण्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांचे आवाहन

देवगड (प्रतिनिधी) - केंद्रीय सागरी स्वच्छता अभियान केवळ एका दिवसापुरते मर्यादित न राहता, नागरिक, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन महिन्यातून किमान एकदा तरी स्वच्छता अभियान राबवावे. आपल्या किनारपट्टीचा परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न होणे आवश्यक आहे. स्वच्छतेचे महत्त्व सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असून, त्यामध्ये आपला सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी केले. कुणकेश्वर येथे आयोजित सागरी स्वच्छता अभियानाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर, केंद्रनिरीक्षक डॉ. सरस्वती, सभापती गणेश राणे, उपसभापती अमोल लोके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब, गटविकास अधिकारी निलेश जगताप, जिल्हा परिषद सदस्य सुनील पारकर, देवदत्त कदम, पंचायत समिती सदस्य सलोनी तळवडेकर, श्रीनिवास कांदळगावकर, प्रवीण कानकेकर, विजय तेंडुलकर, कुणकेश्वरचे माजी सरपंच महेश ताम्हणकर, कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली, सोनाली गावकर, मिठमुंबरी सरपंच बाळकृष्ण गावकर, डॉ घोगरे, संजय आचरेकर, ग्रामपंचायत अधिकारी पांडुरंग शेडगे, गुणवंत पाटील, स्वच्छता विभागाचे विनायक धुरी, वैशाली मेस्त्री, आरोग्य विभागाचे कर्मचारी, पोलीस कर्मचारी, आशा व अंगणवाडी सेविका, सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी, देवगड कॉलेजचे विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर यांनी सागरी स्वच्छता अभियान राबविण्यामागील उद्देश आणि त्याचे महत्त्व स्पष्ट केले. ‘स्वच्छ सागर, सुरक्षित सागर’ हा उपक्रम केवळ एका दिवसाचा नसून, स्वच्छतेचे महत्त्व सातत्याने सर्वांपर्यंत पोहोचविणे आणि नागरिकांमध्ये स्वच्छतेची जाणीव निर्माण करणे आवश्यक आहे. समुद्रकिनारा स्वच्छ ठेवणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असून, अशा उपक्रमांमध्ये नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. अभियानाच्या निमित्ताने उपस्थित मान्यवर, अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी, ग्रामस्थ व स्वयंसेवकांनी एकत्रितपणे कुणकेश्वर बीच परिसराची स्वच्छता केली. या स्वच्छता मोहिमेत तब्बल २० बॅग कचरा संकलित करण्यात आला. समुद्रकिनारा स्वच्छ ठेवण्यासोबतच परिसरात स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याचा संदेश देत स्वच्छतेची शपथ देखील घेतली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg