loader
Breaking News
Breaking News
Foto

संगमेश्वरमध्ये वाजतगाजत गणरायाचे आगमन, चाकरमान्यांच्या आगमनाने बाजारपेठा गजबजल्या

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - कोकणातील सर्वात मोठ्या उत्साहात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाला सुरुवात झाली असून, संगमेश्वर तालुक्यात गणरायाचे वाजतगाजत आगमन होत आहे. रविवारी सायंकाळपासून लांब पल्ल्याच्या प्रवासातून गणपतीच्या मूर्ती गावाकडे आणण्यास सुरुवात झाली. ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलालाची उधळण करत भक्तांनी आपल्या लाडक्या गणरायाचे स्वागत केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गणेशोत्सवासाठी मुंबई, पुणे तसेच अन्य शहरांमधून चाकरमानी मोठ्या संख्येने गावाकडे दाखल झाले आहेत. त्यामुळे संगमेश्वरची बाजारपेठ, बसस्थानक आणि रेल्वेस्थानक परिसरात मोठी गर्दी दिसून येत आहे. गणेशमूर्ती, सजावटीचे साहित्य, पूजेचे साहित्य आणि फुलांच्या खरेदीसाठी बाजारपेठा गजबजल्या आहेत. दरम्यान, सोमवारी सकाळपासून संगमेश्वर परिसरात पावसाने हजेरी लावल्याने गणेशभक्तांची काहीशी धावपळ झाली. मात्र, पावसाची पर्वा न करता गणरायाच्या स्वागताचा उत्साह कायम असल्याचे चित्र दिसून आले.

टाईम्स स्पेशल

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत राहावी तसेच उत्सव शांततेत पार पडावा, यासाठी संगमेश्वर पोलिसांकडून आवश्यक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बाजारपेठ आणि प्रमुख मार्गांवर पोलिसांकडून लक्ष ठेवण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg