देवगड, (प्रतिनिधी) - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देवगड तालुक्यात गणपती सजावट स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा संपर्क अध्यक्ष संतोष शिंगाडे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचा अविभाज्य भाग आहे. गणरायाच्या आगमनानिमित्त घराघरांत भक्तिमय वातावरण निर्माण होते. गणपतीची आकर्षक सजावट, सुंदर आरास, कलात्मकता आणि पर्यावरणपूरक सजावटीच्या माध्यमातून गणेशभक्त आपल्या सर्जनशीलतेचे दर्शन घडवतात. याच कलागुणांना वाव देण्यासाठी आणि गणेशोत्सवातील उत्साह अधिक वाढवण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत देवगड तालुक्यातील गणेशभक्त, मंडळे तसेच सजावटप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष संतोष मणचेकर यांनी केले आहे. या गणपती सजावट स्पर्धेत गणपतीची आकर्षक व सुंदर आरास, सजावटीतील नावीन्य, कलात्मकता तसेच पर्यावरणपूरक साहित्याचा वापर यांना विशेष महत्त्व देण्यात येणार आहे. स्वच्छता आणि सुरक्षिततेची काळजी घेत गणरायाची आरास सजविणाऱ्या स्पर्धकांना आपले कौशल्य दाखविण्याची ही उत्तम संधी आहे. स्पर्धेच्या माध्यमातून गणेशभक्तांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन मिळणार असून, गणेशोत्सव अधिक भक्तिमय आणि उत्साहपूर्ण करण्याचा मनसेचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे.
गणपती सजावट स्पर्धेतील विजेत्यांसाठी आयोजकांकडून आकर्षक बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे. प्रथम क्रमांक : ₹५,५५५/-, द्वितीय क्रमांक : ₹३,३३३/-, तृतीय क्रमांक : ₹२,२२२/- याशिवाय सहभागी स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी उत्तेजनार्थ बक्षिसेही ठेवण्यात आली आहेत. देवगड तालुक्यातील सर्व गणेशभक्त, गणेश मंडळे आणि सजावटप्रेमींनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या कलात्मकतेचा आणि भक्तिभावाचा परिचय द्यावा. सुंदर, आकर्षक आणि पर्यावरणपूरक गणपती सजावटीच्या माध्यमातून या स्पर्धेला उत्तम प्रतिसाद द्यावा, असे आवाहन तालुका अध्यक्ष संतोष मणचेकर यांनी केले आहे.









































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.