loader
Breaking News
Breaking News
Foto

बहुविकलांग मुलांसाठी समर्पित सहा महिलांचा जेसीआय दापोलीकडून सन्मान; ‘Salute the Silent Stars’ उपक्रमातून जेसीआय सप्ताहाचा समारोप!

चंद्रशेखर जोशी, दापोली : बहुविकलांग व गतिमंद मुलांच्या शिक्षण, संगोपन आणि पुनर्वसनासाठी आपले आयुष्य समर्पित भावनेने कार्य करणार्‍या सहा महिला कर्मचार्‍यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जेसीआय दापोलीच्या वतीने ‘Salute the Silent Stars’ हा उपक्रम राबविण्यात आला. आनंद फाऊंडेशन संचलित बहुविकलांग व गतिमंद मुलांचे पुनर्वसन व शिक्षण केंद्र, जालगाव, दापोली येथे १५ सप्टेंबर रोजी जेसीआय सप्ताहाच्या ग्रँड फिनालेनिमित्त हा उपक्रम पार पडला. बहुविकलांग मुलांचे शिक्षण, संगोपन, दैनंदिन गरजा आणि त्यांची काळजी घेणे हे अत्यंत संयम, संवेदनशीलता आणि समर्पणाची गरज असलेले कार्य आहे. या सहाही महिला अत्यंत ममत्वाने आणि निष्ठेने ही जबाबदारी पार पाडत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विशेष म्हणजे गणेशोत्सव, दिवाळी तसेच उन्हाळी सुट्टीच्या काळात अनेक मुलांना पालक घरी घेऊन जाऊ शकत नाहीत. अशा वेळी या महिला स्वतःच्या कुटुंबापासून दूर राहून केंद्रातील मुलांसोबतच राहतात आणि त्यांची काळजी घेतात. कोणतीही अपेक्षा न ठेवता त्या सातत्याने आणि मनापासून आपले कार्य करत आहेत. या विशेष मुलांच्या चेहर्‍यावर उमटणारे हास्य हीच त्यांच्या सेवाभावाची खरी पावती आहे. त्यांच्या या निस्वार्थ कार्याला समाजाकडून अधिक कौतुक आणि प्रोत्साहन मिळणे आवश्यक आहे. विविध शासकीय व सार्वजनिक संस्थांमध्ये कार्यरत कर्मचार्‍यांचा सामाजिक संस्थांकडून वेळोवेळी गौरव केला जातो. मात्र, अशा विशेष मुलांच्या सेवेत प्रत्यक्ष झोकून देऊन कार्य करणार्‍या व्यक्तींचे योगदान अनेकदा व्यापक समाजाच्या लक्षात येत नाही. याच भावनेतून जेसीआय दापोलीने या सहा महिलांच्या कार्याची दखल घेतली व माहेश्वरी विचारे, संगीता गुहागरकर, मनीषा पालव, श्रावणी गोवले, ऋतुजा उजाळ, सानिका भुवड या सहा कर्मचार्‍यांचा गौरव करण्यात आला.

टाइम्स स्पेशल

या सोहळ्यासाठी जेसीआय दापोलीचे अध्यक्ष जेएफएम डॉ. कुणाल मेहता, सचिव जेसी एचजीएफ रोशन वेदक, जेसीआय सप्ताह समन्वयक जेएफएम तेजस मेहता, प्रकल्प संचालक जेएफडी कुणाल मंडलीक, प्रकल्प समन्वयक जेसी एचजीएफ विनय शिगवण, जेसी भूषण इस्वलकर, जेसी एचजीएफ सीए ऋषिकेश शेठ, जेसी एचजीएफ मयुरेश शेठ, जेसी प्रसाद दाभोळे, जेसी एचजीएफ अद्नान मुकादम, जेसी रोहन आंब्रे आणि जेसी ऋषिकेश तलाठी उपस्थित होते. जेसीआय सप्ताहाचा समारोप अशा सेवाभावी कार्याला मानवंदना देत झाल्याने ‘Salute the Silent Stars’ हा उपक्रम माणुसकी, संवेदनशीलता आणि कृतज्ञतेचा सुंदर संदेश देणारा ठरला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg