loader
Breaking News
Breaking News
Foto

आंतरराष्ट्रीय सागरी किनारा स्वच्छता दिवसानिमित्त रत्नागिरी मांडवी किनाऱ्यावर स्वच्छता अभियान

रत्नागिरी : आंतरराष्ट्रीय सागरी किनारा स्वच्छता दिवसानिमित्त सागरी सीमा मंच, दक्षिण रत्नागिरी जिल्ह्याच्या पुढाकाराने दिनांक 19 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर या कालावधीत रत्नागिरी व राजापूर तालुक्यातील 20 समुद्रकिनाऱ्यांवर आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वच्छ सागर अभियान’ अंतर्गत आज मांडवी समुद्रकिनारी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सकाळी 7.30 वाजता झालेल्या या अभियानात विविध सामाजिक संस्था, पर्यटन संस्था, उद्योग, व्यापारी संघटना, शासकीय विभाग, स्थानिक नागरिक व स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. गौरी-गणपती विसर्जनानंतर मांडवी किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात निर्माल्याच्या प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक बाटल्या तसेच इतर कचरा जमा झाला होता. अभियानादरम्यान हा कचरा संकलित करून किनारा स्वच्छ करण्यात आला. सुमारे 2.5 टन कचरा संकलित करण्यात आला असून दीड ट्रॅक्टर कचऱ्याची वाहतूक करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

स्वच्छता अभियानात रत्नागिरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी उपास्थित राहून त्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून अभियान सुरवात करण्यात आली. यावेळी बोलताना त्यांनी मांडवी किनाऱ्याच्या स्वच्छतेसाठी नगरपरिषदेचे सहकार्य कायम राहील, असे सांगितले. सागरी सीमा मंचाच्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. यावेळी स्थानिक नगरसेवक बंटी किर व राजीव किर, नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी बेहरे व कर्मचारी उपस्थित होते. अभियानातून संकलित झालेला कचरा नगरपरिषदेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी वाहनाद्वारे वाहून नेला. या उपक्रमात महाराष्ट्र सागरी मंडळ बंदर विभाग रत्नागिरी, अल्ट्राटेक सिमेंट कंपनी, मांडवी पर्यटन संस्था, रत्नागिरी पर्यटन संस्था, लघु उद्योग फिश इंडस्ट्रीजचे कर्मचारी, लायन्स क्लब रत्नागिरी, रत्नागिरी शहर व्यापारी संघ, रत्नागिरी मराठी पत्रकार परिषद – रत्नागिरी जिल्हा, श्री देव भैरी देवस्थान मांडवी, मैत्री ग्रुप–हॉटेल सी फॅन मांडवी, रा. स्व. संघ सेवा विभाग, सागरी सीमा मंच तसेच स्थानिक नागरिक, विविध संस्थांचे पदाधिकारी व स्वयंसेवक सहभागी झाले.

टाईम्स स्पेशल

अभियानासाठी अल्ट्राटेक सिमेंट कंपनी व रत्नागिरी शहर व्यापारी संघाच्या वतीने रिफ्रेशमेंटची व्यवस्था, तर लायन्स क्लब रत्नागिरीच्या वतीने मल्टी युटिलिटी वेस्ट कलेक्शन बॅग व हँड ग्लोव्हज उपलब्ध करून देण्यात आले. यावेळी उपस्थित संस्था, मंडळांचे पदाधिकारी, स्वयंसेवक व नागरिकांना स्वच्छतेची प्रतिज्ञा सागरी सीमा मंचाचे दक्षिण रत्नागिरी जिल्हा संयोजक स्वप्नील सावंत यांनी दिली. मांडवी बीच प्रमुख तथा हॉटेल सी फॅनचे संचालक सुहास ठाकूर देसाई यांनी प्रास्ताविक केले व आभार मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg