loader
Breaking News
Breaking News
Foto

गणरायाचे आज आगमन, कोकणात सर्वत्र चैतन्यदायी वातावरण

गावखडी (वार्ताहर) - बाप्पा मोरया चा जयघोष... ढोल ताशांचा निनाद... फुलांनी सजवलेल्या माळा. आणि गणेश भक्तीचे उत्साहित चेहरे अशा भक्तिमय वातावरणात गणेश चतुर्थी पूर्वीच गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बापाला घरी नेणे पसंत केले आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी होणारी धावपळ टाळण्यासाठी आणि पावसाचे विघ्न टाळण्यासाठी अनेक गणेश भक्तांनी आज रविवारी अगदी वाजत गाजत रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी गावात बाप्पाची मूर्ती घरी आणली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गणरायाच्या पूजेच्या तयारीसाठी लागणारे साहित्य, सजावटीचे साहित्य खरेदीसाठी रत्नागिरी बाजारपेठ फुललेल्या आहेत. पूजेसाठी लागणारी तसेच सजावटीसाठी फुले, केवड्यांची पाने, कमळ, दुर्वा, शमी पत्रे, फुलपत्री यांना मागणी वाढत आहे, प्रसादासाठी पेढे, मोदक यांचीही खरेदी चालू असून बाजारात मोठ्या प्रमाणावर उलाढाल सुरू आहे. गणरायाच्या आगमनाची लगबग रविवारी बाजारपेठेत तसेच मेर्वी सारख्या ग्रामीण भागात घरोघरी गणरायाची लगबग दिसून येत आहे, गणेश भक्त गणपती बाप्पाला घरी घेऊन येताना दिसत आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg