loader
Breaking News
Breaking News
Foto

रिमझिम पावसात माखजन पंचक्रोशीत बाप्पाचे घरोघरी आगमन

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - संगमेश्वर तालुक्यात माखजन, आरवली पंचक्रोशीत हलक्याशा रिमझिम पावसात आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन घरोघरी झाले. सकाळपासून मधेच ऊन आणि मधेच पावसाची काळोखी आणि रिमझिम यामुळे गणपतीची मूर्ती घरी नेण्याची लगबग पहायला मिळाली. झांज, मृदूंग, काही ठिकाणी ताशे अशा पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि गणरायच्या जयघोषात बाप्पाचे आगमन करण्यात आले. अलीकडे चारचाकी गाड्यांमधून गणपतीची मूर्ती आणण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले. त्यामुळे मिरवणुकीने घरगुती गणपती आणण्याचे प्रमाण काही अंशी घटलेले पाहायला मिळत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

काही ठिकाणी पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या हेतूने प्लास्ट ऑफ पॅरिस च्या मूर्तीऐवजी शाडूच्या मूर्ती घरी आणण्याचा कल वाढीस लागला आहे. माखजन आरवली परिसरात सुमारे १२ गणेशमूर्ती कारखाने आहेत. हे कारखाने गेले २ दिवस गजबजलेले पाहायला मिळत आहेत. लहान थोर मंडळी रंगीबेरंगी कपडे घालून आपल्या बाप्पाला घरी नेण्यासाठी रममाण झालेले पाहायला मिळाले. घरोघरी केलेली आकर्षक रोषणाई, देखावे, मखर आणि त्यात विराजमान झालेले बाप्पा आदिंमुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. माखजनसह आरवली पंचक्रोशीत गणेशोत्सवाला शांततेत व उत्साहात सुरवात झाली.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg