खेड, रत्नागिरी : कंत्राटी, मानधन, तात्पुरती आणि आउटसोर्सिंग व्यवस्थेत वर्षानुवर्षे सेवा देणाऱ्या कर्मचारी-कामगारांच्या रोजगाराच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असून, या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी युवा रोजगार जनहक्क संघर्ष संघ — महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शुक्रवार, २ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता खेड प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.सफाई कामगार, वीज विभागातील वायरमन व तांत्रिक कर्मचारी, अंगणवाडी सेविका-मदतनीस, आशा स्वयंसेविका, एसटी कर्मचारी, ग्रंथालय कर्मचारी, शासकीय-निमशासकीय कार्यालयातील कर्मचारी, क्लार्क, इंजिनिअर तसेच विविध विभागांमध्ये कंत्राटी व आउटसोर्सिंग पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा हा प्रश्न आहे.वर्षानुवर्षे प्रत्यक्ष सेवा देऊनही अनेक कर्मचाऱ्यांना रोजगाराची स्थिरता मिळत नाही. कामाचे स्वरूप कायमस्वरूपी असताना रोजगार मात्र कंत्राटी किंवा तात्पुरत्या स्वरूपाचा राहतो. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांच्या सेवाकालाचा, अनुभवाचा, पात्रतेचा आणि प्रत्यक्ष कामातील योगदानाचा योग्य विचार करून शासनाने ठोस धोरण करावे, अशी मागणी संघाकडून करण्यात येत आहे.
संघाच्या प्रमुख मागण्या :1. दीर्घकाळ सेवा करणाऱ्या कंत्राटी, मानधन व आउटसोर्सिंग कर्मचाऱ्यांचे विभागनिहाय सर्वेक्षण करावे.2. कर्मचाऱ्यांची पात्रता, सेवाकाल, अनुभव, कौशल्य व प्रत्यक्ष कामाचे स्वरूप यांचा आढावा घ्यावा.3. लागू कायदे, नियम व शासनाच्या धोरणानुसार पात्र कर्मचाऱ्यांच्या सेवेसाठी पारदर्शक व ठोस धोरण तयार करावे.4. कंत्राटी व मानधन कर्मचाऱ्यांना लागू असलेले वेतन व इतर वैधानिक हक्क सुनिश्चित करावेत.5. कंत्राटदार बदलल्यामुळे र्षानुवर्षे सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे रोजगाराचे भविष्य धोक्यात येऊ नये, यासाठी योग्य व्यवस्था करावी.6. कर्मचारी-कामगार प्रतिनिधी आणि शासन/प्रशासन यांची संयुक्त बैठक घेऊन प्रश्नावर कालबद्ध पद्धतीने निर्णय घ्यावा.“आपला विभाग वेगळा असला तरी प्रश्न एकच — रोजगाराची सुरक्षितता आणि न्याय्य सेवाशर्ती,” अशी भूमिका युवा रोजगार जनहक्क संघर्ष संघाने मांडली आहे.










































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)









































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.