loader
Breaking News
Breaking News
Foto

मंगलमूर्ती प्रतिष्ठान तर्फे कर्ले आंबेशेत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मान्यवरांचा सत्कार

रत्नागिरी: आज गणेश चतुर्थी दिवशी कर्ले आंबेशेत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळची भव्य मिरवणूक रत्नागिरी शहरातून कर्ले आंबेशेत गावाकडे गेली, या मिरवणुकीचे स्वागत रत्नागिरीतील मंगलमूर्ती प्रतिष्ठान तर्फे करण्यात आले. मंगलमूर्ती प्रतिष्ठानचे प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मान्यवरांचे श्रीराम मंदिर रत्नागिरी येथे स्वागत केले.ज्येष्ठ नेते सुधाकर सावंत , सामाजिक कार्यकर्ते दीपक राऊत, यांनी समाजनेते जयसिंग घोसाळे ,शेखर घोसाळे , माजी सरपंच सुर्वे आदी मान्यवरांचे स्वागत केले .

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रत्नागिरी जिल्ह्यात कर्ले आणि आंबेशेत या दोन गावांचे गणपती एकच वेळी भव्य मिरवणुकीने नेले जातात गेली, 40 वर्षे ही परंपरा सुरू आहे. यंदाचे 41 वे वर्ष आहे. यावेळी मोठ्या संख्येने तरुण पिढी मिरवणुकीत सहभागी झालेली दिसली. या दोन्ही गावांचा आदर्श जिल्ह्यातील इतर गावांनी घेण्यासारखा आहे. दोन्ही गावाची या निमित्ताने एकजूट दिसून आली. मिरवणुकीत प्रचंड उत्साहाचे वातावरण होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg