loader
Breaking News
Breaking News
Foto

सिंधुदुर्ग जिल्ह्यात भीषण जलसंकटाचे सावट: पावसात १४७० मि.मी.ची तूट, बळीराजा चिंतेत

सावंतवाडी - सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा पावसाने ओढ दिल्यामुळे भीषण जलसंकट आणि दुष्काळाची छाया अधिकच गडद झाली आहे. १ जानेवारी ते १९ सप्टेंबर २०२६ या कालावधीत जिल्ह्यात अवघा २१३८.४ मि.मी. पाऊस नोंदवला गेला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ३६०९.० मि.मी. पाऊस झाला होता. म्हणजेच यंदा तब्बल १४७०.६ मि.मी. पावसाची मोठी तूट निर्माण झाली आहे. मुळदे येथील उद्यानविद्या महाविद्यालयाच्या ग्रामीण कृषि मौसम सेवा केंद्राने ही चिंताजनक आकडेवारी जाहीर केली असून, यामुळे जिल्ह्यातील शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. यंदाच्या हंगामात मुसळधार पाऊस न पडल्याने ओढे व नदी-नाले वाहते राहिले असले, तरी पुराची परिस्थिती निर्माण झाली नाही. परिणामी, जमिनीमध्ये पाणी मुरण्याचे प्रमाण अत्यंत कमी राहून भूजल पातळीत अपेक्षित वाढ झालेली नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पावसाच्या तुटीसोबतच जिल्ह्यात उकाडा कमालीचा वाढला आहे. गेल्या २४ तासांत कमाल तापमान ३३.०° सेल्सिअस तर किमान तापमान २३.०° सेल्सिअस नोंदवले गेले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तापमानात ४° सेल्सिअसने वाढ झाली आहे. हवामानातील सकाळची आर्द्रता ९२% तर दुपारची आर्द्रता ७८% राहिल्यामुळे प्रचंड उकाडा आणि दमटपणा जाणवत आहे. भात पीक सध्या दाणे भरण्याच्या आणि काढणीच्या टप्प्यात आहे. अशा वेळी पावसाने दिलेली ओढ आणि वाढता उकाडा यामुळे भात उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसाअभावी जमिनीतील पाझर कमी झाले आहेत. त्यामुळे आगामी उन्हाळ्यात विहिरी आणि कूपनलिकांची पाणीपातळी वेगाने खाली जाऊन तीव्र पाणीटंचाई भासणार आहे. जास्त आर्द्रता आणि वाढत्या तापमानामुळे भात पिकावर 'तुडतुडे' व 'करपा' रोगाचा, तर आंबा-काजूच्या नव्या पालवीवर किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

टाईम्स स्पेशल

हवामानातील या प्रतिकूल बदलांचा सामना करण्यासाठी प्रशासकीय व वैयक्तिक पातळीवर पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी ओढ्यांवर तात्पुरते बंधारे बांधून पाणी अडवावे, फळझाडांच्या बुंध्याशी पालापाचोळ्याचे आच्छादन (Mulching) करून ओलावा टिकवावा आणि सिंचनासाठी ठिबक अथवा तुषार सिंचन पद्धतीचा वापर करावा, असे आवाहन कृषी तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg