loader
Breaking News
Breaking News
Foto

धामापूर रामणवाडीत साकारले ‘श्रीक्षेत्र गणपतीपुळे’; रोशन रामाणे यांचा देखावा ठरतोय आकर्षणाचे केंद्र

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - कोकणातील लाडक्या बाप्पाच्या उत्सवात भाविकांची कल्पकता आणि भक्तिभाव नेहमीच वाखाणण्याजोगा असतो. याचाच प्रत्यय संगमेश्वर तालुक्यातील धामापूर तर्फे संगमेश्वर येथील रामणवाडीमध्ये पाहायला मिळत आहे. येथील तरुण गणेशभक्त रोशन रमेश रामाणे यांनी घरगुती गणेशोत्सवात साकारलेला 'श्रीक्षेत्र गणपतीपुळे' येथील नयनरम्य देखावा सध्या संपूर्ण पंचक्रोशीतील भाविकांच्या विशेष पसंतीस उतरत असून कौतुकाचा विषय ठरला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या देखाव्यात अथांग पसरलेला निळाशार समुद्र, किनाऱ्यावर खेळणारी लहान मुले, पर्यटनाचा आनंद घेणारे भाविक आणि समुद्राच्या वाळूत बसून शिवलिंग साकारणारी 'बाल गणेशा'ची मोहक मूर्ती अत्यंत बारकाईने मांडण्यात आली आहे. बाप्पाच्या मागे दिसणारी टेकडी आणि हुबेहूब साकारलेले प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिर या संपूर्ण देखाव्याला जिवंत रूप देतात. मूर्तीच्या भोवती खेळणारे मूषक आणि समुद्रकिनाऱ्यावरील वातावरण यामुळे भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फिटत आहे.

टाईम्स स्पेशल

कोकणात गणेशोत्सवाचा सण मोठ्या भक्तीमय वातावरणात साजरा होतो. अशा वेळी ग्रामीण भागातील घरगुती गणेशोत्सवात देखील विविध सामाजिक, ऐतिहासिक आणि धार्मिक देखावे सादर करण्याची स्पर्धा पाहायला मिळते. रोशन रामाणे यांच्या या कल्पक कलाकृतीचे व कौशल्याचे पंचक्रोशीतील ग्रामस्थ, नातेवाईक आणि भाविकांकडून भरभरून कौतुक केले जात असून देखावा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची गर्दी होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg