loader
Breaking News
Breaking News
Foto

नामदार श्री योगेश कदम यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन पेवेकोंड खालचीवाडीतील ग्रामस्थांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश!

खेड - महाराष्ट्र राज्याचे मंत्री महोदय नामदार योगेश कदम यांच्या कार्यतत्पर कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन पेवेकोंड संपूर्ण खालचीवाडी येथील ग्रामस्थांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. नामदार योगेश कदम यांचे शुभहस्ते येथिल मंजूर विकास कामांचे भूमीपूजन करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मंत्री नामदार योगेश कदम यांच्या माध्यमातून विकासासाठी सुरू असलेले प्रयत्न, अनेक झालेली विकास कामे जनतेशी असलेला सातत्यपूर्ण संपर्क आणि विविध विकासकामांना दिले जाणारे प्राधान्य यामुळे ग्रामस्थांनी शिवसेनेसोबत मंत्री महोदय नामदार योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली सक्रियपणे काम करण्याचा निर्णय घेतला.

टाइम्स स्पेशल

यावेळी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अस्मिता केंद्रे, मंडणगड शिवसेना तालुका प्रमुख रत्नागिरी जिल्हा परिषदेचे सदस्य प्रताप घोसाळकर, मंडणगड तालुक्याच्या प्रथम नागरीक सभापती प्रणाली चिले, विभाग प्रमुख उपसभापती दिपक मालुसरे, शिवसेना गटनेते पं स सदस्य अनिल रटाटे, महिला विभाग संघटक पं स सदस्या दिप्ती घडशी, शिवसेना तालुका संघटक अनंत लाखण, मुंबई संपर्क प्रमुख शंकर बांद्रे, शिवसेना उपतालुका प्रमुख रामदास रेवाळे, माजी तालुका संघटक तुकाराम गायकवाड, शिवसेना विभागप्रमुख इरफान बुरोंडकर, माजी पं स सदस्य नितीन म्हामूणकर, उद्योजक संदेश चिले, नगरसेवक सुभाष सापटे, मुंबई उपतालुका संघटक अजय शिगवण, युवासेना पदाधिकारी विराज गायकवाड, रुपेश दुर्गवले, माजी सरपंच मनेष बाईत उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg