केळंबे-लांजा(सिराज नेवरेकर) विलवडे रेल्वे स्थानकावर विविध मागण्यांसाठी २० सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या लाक्षणिक उपोषणाच्या पार्श्वभूमीवर लांजा पोलिस ठाण्यात बुधवारी १६ सप्टेंबर विलवडे रेल्वे प्रवासी संघटना, मुंबई ग्रामीण संघर्ष समितीच्या पदाधिकारी व शिष्टमंडळासोबत बैठक संपन्न झाली.
उपोषणादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी लांजा पोलीस निरीक्षक यांच्याकडून आवश्यक मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या. यावेळी बोलताना निळकंठ बगळे यांनी उपोषण शांततामय आणि कायदेशीर मार्गाने पार पाडावे, रेल्वे प्रवासी, रेल्वे वाहतूक तसेच सार्वजनिक वाहतुकीस कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना दिल्या. तसेच घोषणाबाजी, वाद-विवाद किंवा अनुचित प्रकार घडणार नाहीत याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले.रेल्वे प्रशासन आणि पोलिस प्रशासनास आवश्यक ते सहकार्य करावे, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करू नये तसेच आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तत्काळ पोलिस प्रशासनाला माहिती द्यावी असेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले. यावेळी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांच्या विविध मागण्या व तक्रारींबाबत पोलिसांनी माहिती जाणून घेतली. उपोषण शांततामय वातावरणात पार पाडण्याचे आवाहनही करण्यात आले.बैठकीस विलवडे रेल्वे प्रवासी संघटना, मुंबई ग्रामीणचे अध्यक्ष अमोल रेडीज, उपाध्यक्ष भास्कर खामकर, संतोष चव्हाण, दीपक जानकर, सल्लागार सुभाष लाड, जगदीश जी. राजापकर, प्रकाश तोरस्कर तसेच सदस्य तुषार पालकर, युवराज हांडे, विश्वनाथ गुरव, रवींद्र जानकर आणि दीपक तोरस्कर उपस्थित होते.
दरम्यान, संघर्ष समितीच्या कार्यकारिणीने उपोषण शांततामय वातावरणात पार पाडण्याची हमी देत पोलिस प्रशासनास आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.








































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.