loader
Breaking News
Breaking News
Foto

मच्छिमारांची पिळवणूक करणार्‍यांविरोधात आवाज उठविण्याचा अब्दुल बिजली खान यांचा निर्धार!

रत्नागिरी : रत्नागिरीतील गोरगरीब मच्छिमार बांधवांची पिळवणूक करणार्‍या फिशमिल कंपन्यांच्या विरुध्द आवाज उठवण्याचा निर्धार भाजपचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री. अब्दुल बिजली खान यांनी केला आहे. त्यांनी सांगितले की मागील काही काळापासून या फिश मिल कंपन्या गोर गरीब मच्छिमारांची बेसुमार पिळवणूक करीत आहेत. केवळ रत्नागिरीतीलच नव्हे तर कोकणातील मच्छिमारी हा उपजीविकेचे एक प्रमुख साधन म्हणून मानले जाते. परंतु मच्छिमारांची पिळवणूक होणे गैर असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत बोलताना श्री. अब्दुल बिजली खान यांनी सांगितले की, ‘‘मागील काही काळापासून फिशमिल कंपन्या श्रमिक मच्छिमार बांधवांची बेसुमार पिळवणूक करीत आहेत. आता पावसाळ्यानंतर मागील महिन्यात मच्छिमारी सुरु झाली. चांगला दर मिळवून देणारी मच्छि काही दिवसांपासून मिळेनाशी झाली आहे. आता केवळ बांगडी, तारली व इतर छोटी मासळी मिळत आहे. या छोट्या मासळीला वाजवी दर मिळाला तर खर्च वसुल होईल या आशेवर असलेल्या नौका मालकांच्या आशेवर या कंपनीनी जणू विरजण घातले आहे’’ असे त्यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यांनी पुढे सांगितले, ‘‘फिश मिल कंपन्या 32 किलोच्या एका टबला आजवर 1800 रुपये दर देत असत. परंतु आता त्यांनी दर कमी करण्यास सुरुवात केली असून एका आठवड्यात हा दर फक्त रुपये 1150 पर्यंत उतरवण्यात आला. फिश मिल कंपन्या संगनमत करुन रोजच्या रोज दर पाडत असल्याने मच्छिमार विलक्षण अडचणीत आले आहेत. आधीच इंधनाचे दर, खलाशांचे पगार व नौका देखभाल खर्च वाढले असून मच्छिमार मेटाकुटीस आले आहेत.’’ श्री. अब्दुल बिजली खान यांनी पुढे सांगितले, ‘‘अशा स्थितीत मच्छिमार उद्ध्वस्त होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकर्‍यांना जसा शेतीमालाला हमी भाव दिला जातो तसेच गोरगरीब मच्छिमारांना वाजवी भाव मिळणे आवश्यक आहे. हा त्यांच्यावरील अन्याय कदापि खपवून घेणार नाही. बंदरे व मत्स्य व्यवसाय मंत्री ना. निलेश राणे व उद्योगमंत्री तसेच रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्याकडे हे गार्‍हाणे मांडण्यात येईल’’ असे त्यांनी सांगितले.

टाइम्स स्पेशल

श्री. अब्दुल बिजली खान यांनी सांगितले की, ‘‘स्थानिक फिश मिल कंपन्या पर राज्यातील अवंतिका, क्वालीटी, ईगल, ग्लोबल आदी कंपन्यांशी करार करतात. त्यांना भरमसाठ दराने मच्छि विकतात, गडगंज नफा कमावतात आणि कष्ट करणार्‍या गोरगरीब मच्छिमारांची व नौका मालकांची मात्र पिळवणूक करतात. यावर आवाज उठविल्याशिवाय राहणार नाही’’ असा त्यांनी निर्धार व्यक्त केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg