वरवेली (गणेश किर्वे) - संगमेश्वर तालुक्यातील निवे बुद्रुक गावात युवा गणेश मित्र मंडळाच्या ’निव्याचा राजा’ ची २० व्या वर्षात उत्साहात स्थापना करण्यात आली आहे. युवा गणेश मित्र मंडळ व दुर्गवीर प्रतिष्ठान यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा आपल्याच तालुक्यातील ऐतिहासिक महिमतगड किल्ल्याची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे. हा देखावा शिवप्रेमी आणि गणेश भक्तांसाठी विशेष आकर्षण ठरत असून, मोठ्या प्रमाणात भाविक प्रतिसाद देत आहेत.
मंडळाने यापूर्वीही सामाजिक बांधिलकी जपत विविध देखावे सादर केले आहेत. सामाजिक कार्याची दखल घेऊन मंडळाला आजवर मंगलमूर्ती प्रतिष्ठान पुरस्कार, रत्नागिरी पोलीस पुरस्कार, देवरूख पोलीस ठाणे पुरस्कार आणि लोकमान्य टिळक शासन पुरस्कार प्राप्त झाले आहेत. गणेशोत्सवानिमित्त दि. २१ सप्टेंबर रोजी खेळ पैठणीचा दि. २३ सप्टेंबर रोजी भव्य श्री गणेशा आरोग्य शिबिर, रक्त चाचणी, नेत्र तपासणी, मधुमेह, उच्चरक्तदाब, किटकजन्य जलजन्य आजार आरोग्य विषयक मार्गदर्शन, श्री सत्यनारायण महापूजा व महाप्रसाद, शक्ती-तुरा जंगी सामना दि. २४ सप्टेंबर रोजी महिला वर्गाचा पारंपारिक फुगडी खेळ,तसेच दररोज भजन, आरती व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. या सुवर्णसंधीचा लाभ सर्व भाविकांनी घ्यावा, असे आवाहन युवा गणेश मित्र मंडळ, निवे बुद्रुकच्या पदाधिकार्यांनी केले आहे.











































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)









































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.