संगमेश्वर (सत्यवान विचारे) : कोकणातील गणेशोत्सव म्हटला की भजनाचा गजर, जाखडी नृत्याचा ठेका आणि पारंपारिक सोंगांची रंगत यामुळे निर्माण होणारे भक्तिमय व उत्साही वातावरण डोळ्यांसमोर उभे राहते. चिपळूण येथील शंकरवाडीमध्ये तब्बल १०० ते १५० वर्षांची गणेशोत्सवाची परंपरा आजही तितक्याच उत्साहाने जपली जात आहे. शंकरवाडीतील गणेशोत्सवात रात्रभर भजनाचा आवाज घुमत असतो. त्याला जाखडी नृत्याची साथ मिळाल्याने संपूर्ण वाडीचे वातावरण उत्साहाने भारून जाते. एका घरातील गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर दुसर्या घराकडे जाताना रस्त्यातच नाच-खेळ आणि विविध पारंपरिक सोंगांची रंगत पाहायला मिळते.
या सोंगांमध्ये विशेष आकर्षण ठरते ते म्हणजे ‘घोडेस्वार’. पूर्वी पावसाळ्यात भात लावणीच्या कामासाठी वापरल्या जाणार्या ‘इरल्या’च्या मध्यभागी गोल कट करून, त्याला आकर्षक झालर लावली जात असे. त्याच्या पुढील भागाला घोड्याचा मुखवटा बसवून काल्पनिक घोडा तयार केला जात असे. या घोड्यावर स्वार होऊन नाचण्याची परंपरा गणेशोत्सवातील खास आकर्षण होती. काळ बदलला तसे या पारंपरिक घोड्याच्या निर्मितीतही बदल झाले. पूर्वीच्या इरल्याची जागा आता लाकूड, फायबर आणि अल्युमिनियमसारख्या साहित्याने घेतली असली, तरी या परंपरेतील उत्साह आणि आपलेपणा मात्र कायम आहे.
गांधारेश्वर मित्र मंडळाचे भास्कर भुवड आणि अरविंद भुवड हे तरुण आजही उत्स्फूर्तपणे घोडेस्वाराची भूमिका साकारत ही अनोखी परंपरा पुढे नेत आहेत. त्यांच्या नृत्यामुळे गणेशोत्सवातील पारंपरिक सोंगांना आणखी रंगत येते. आधुनिक डिजिटल युगातही शंकरवाडीतील ग्रामस्थांनी आपल्या पूर्वजांनी जपलेल्या गणेशोत्सवाच्या परंपरांना नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे काम सुरू ठेवले आहे. त्यामुळे शंकरवाडीचा हा पारंपरिक गणेशोत्सव कोकणच्या सांस्कृतिक वारशाचे जिवंत दर्शन घडवणारा उत्सव ठरत आहे.









































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.