loader
Breaking News
Breaking News
Foto

भातगाव - गोळेवाडी येथे गणपती विसर्जन तलावाचा लोकार्पण सोहळा उत्साहात आणि जल्लोषात संपन्न

आबलोली ( वार्ताहर ) : गुहागर तालुक्यातील भातगाव - गोळेवाडी येथे गणपती विसर्जन तलावाचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला. यावेळी ग्रामस्थांच्या आनंदाला उधाण आले होते. जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती महेश नाटेकर, गुहागरचे सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती निलेश सुर्वे, माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल, पंचायत समिती सदस्या सौ. सुचिता घाणेकर - गोताड,सरपंच रेणुका आग्रे, विजय मोहिते,सागर काजरोळकर, विशाल गोताड आदी. मान्यवरांना वाजत गाजत ढोल ताशांच्या, बँजो पार्टीच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिष बाजीत गणपती विसर्जन तलावाच्या लोकार्पण सोहळ्याच्या ठिकाणी नेण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यानंतर जिल्हा परिषदेचे कृषी व पशुवर्धन सभापती महेश नाटेकर यांच्या हस्ते फित कापून व सभापती प्रणव पोळेकर यांचे हस्ते श्रीफळ वाढवून गणपती विसर्जन तलावाच्या लोकार्पण सोहळ्याचे उदघाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला भातगाव गोळेवाडीतील ग्रामस्थ, महिला - पुरुष कार्यकर्ते यांच्यासह गावकरी,मानकरी,जागा मालक बहुसंख्येने उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg