loader
Breaking News
Breaking News
Foto

महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा 2026 पुन्हा स्थगित, 26 सप्टेंबर चा पेपर रद्द ,आता केव्हा होणार पेपर ?

पुणे :सावित्रीबाई फुले पुणे विश्वविद्यालय मार्फत आयोजित 41 व्या महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा 2026 ला पुन्हा रद्द करण्यात आले आहे. .ही परीक्षा 26 सप्टेंबर रोजी होणार होती. या परीक्षेला तिसऱ्यांदा स्थगित करण्यात आले आहे.महाराष्ट्र राज्याच्या सेट परीक्षा 2026 ला तिसऱ्यांदा रद्द करण्यात आले आहे ही परीक्षा 27 सप्टेंबरला होणार होती आता ही परीक्षा त्यादिवशी होणार नाही. सावित्रीबाई फुले पुणे महाविद्यालयातर्फे आयोजित परीक्षा आता 25 ऑक्टोबरला होणार आहे.या सर्व गोंधळात परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना किती त्रास सहन करावा लागतो आहे. एकदा परीक्षेचा अभ्यास केल्यानंतर पुन्हा परीक्षेचा अभ्यास करावा लागतोय, परीक्षा पुन्हा पुन्हा स्थगित करणे आणि नवीन तारीख देणे यामागे प्रशासनाचा हेतू जरी चांगला असला तरी विद्यार्थी वर्गाला मात्र प्रवासाचा त्रास सोसावा लागतो आहे, तसेच त्यांना मानसिक त्रास ही प्रचंड होत आहे, याला जबाबदार कोण? असा प्रश्न परीक्षार्थी विचारत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पूर्वी निवड परीक्षा सहा जुलै रोजी होणार होती मात्र केस स्थगित करून सहा सप्टेंबर पर्यंत पुढे नेण्यात आली, त्यानंतर आता महाविद्यालयाने पुढची तारीख वाढवून दिली आहे .27 सप्टेंबरला परीक्षा होणार होती तीही रद्द करण्यात आली आता 25 ऑक्टोबरला परीक्षा होणार आहे

टाइम्स स्पेशल

सावित्रीबाई फुले विश्वविद्यालय तर्फे एक सूचना जाहीर करण्यात आली आहे, त्यामध्ये परीक्षा स्थगित करण्याचे मुख्य कारण युनियन पब्लिक सर्विस कमिशन आणि दुसऱ्या परीक्षा घेण्याचा विचार करण्यात आला आहे महाविद्यालयाने 25 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी असल्याकारणाने परीक्षा स्थळापर्यंत प्रवास करताना परीक्षार्थीला अनेक संकटाला सामोरे जावे लागेल, असे म्हटले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg