loader
Breaking News
Breaking News
Foto

दिल्लीच्या मतदार यादीत फारच गोंधळ , भाजपाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, माजी मुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचे देखील नाव SIR च्या यादीमध्ये विसंगतीसह आढळले .

दिल्ली : येथील दिल्लीच्या मतदार यादीत फारच गोंधळ दिसून येत आहे निवडणूक आयुक्त डॉक्टर सुखबीर सिंह संधू आणि काही अन्य मोठ्या अधिकाऱ्यांना त्यांच्या नावातील अंतराबाबत नोटीस बजावण्यात आली आहे. विदेश सचिव विक्रम मिस्त्री, सेबी चेअरमन तूहीन कांता पांडे, पंतप्रधानांचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार अजय कुमार सुद, आरोग्य सचिव पुण्या सलीला, मत्स्यपालन सचिव अभिलक्ष लिखी अशा अनेक मान्यवरांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावले आहे. अनेकांच्या नावातील बदलाचा हा गोंधळ दिसून येत आहे. मतदार नोंदणी प्रक्रियेत मतदार यादीत 1,45,10,299 कोटी मतदारांमधून 47,56,722 मतदारांची नावे कमी करण्यात आली आहेत.मतदारांची अशी नावे आहेत ज्यांची मूलभूत माहिती उपलब्ध नाही. यांची मतदार यादीत नावे नाहीत त्यांना 30 सप्टेंबरपर्यंत नावे दाखल करण्याची मुदत आहे या 47 लाख पेक्षा अधिक लोकांमध्ये अनेक मोठी माणसे आहेत.भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचे देखील नाव SIR च्या यादीमध्ये विसंगतीसह आढळून आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

निवडणूक आयोगाने 47 लाख लोकांमधून सुमारे 33 लाख लोकांना यादीतून बाजूला केले आहे, योग्य माहिती देण्याबाबत त्यांना सुचविण्यात आले आहे. लालकृष्ण अडवाणी आणि मनीष सिसोदिया यांनाही नोटीस पाठवण्यात आली आहे. या दोन्ही नेत्यांच्या कुटुंबात देखील मूलभूत माहिती बाबत गोंधळ आहे. 98 वर्षाचे लाल कृष्ण आडवाणी, त्यांची मुलगी प्रतिभा आणि सून गीतिका यांना नोटीस पाठविण्यात आली आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg