loader
Breaking News
Breaking News
Foto

आंजर्ले खाडी गाळाने भरली; खाडीत साचलेला गाळ काढण्यास शासनकर्त्यांना अपयश

दापोली (प्रतिनिधी) - आंजर्ले खाडीत मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. मासेमारांकडून शासनाकडे वर्षानुवर्षे मागणी करून सुध्दा आंजर्ले खाडीत साचलेला गाळ काढला जात नाही. त्यामुळे अडखळ तसेच आंजर्ले खाडीतून मासेमारी होड्या समुद्रात लोटताना आणि समुद्रातुन होड्या परत अडखळ आंजर्ले खाडी किनार्‍यावर आणताना मासेमारांची मोठीच दमछाक होत आहे. असे असतानाही मासेमारांना भेडसावणाऱी ही मुख्य समस्या मागणी करुन सुध्दा शासनकर्त्यांना सोडविण्याचा अजिबात कळवळा येत नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दापोली तालुक्यातील हर्णे बंदर हे जिल्हयात मासेमारीसाठीचे दुस-या क्रमांकाचे बंदर ओळखले जाते. समुद्रात वादळसदृष्य परिस्थिती निर्माण होते. तेव्हा सुरक्षित ठिकाण म्हणून अडखळ आणि आंजर्ले खाडीच्या किना-यावर हर्णे बंदरात मासेमारी करणार्‍या बोटींना मासेमार आणून लावतात. शिवाय दुरुस्तीसाठीही हाच आंजर्ले अडखळ खाडीकिनाऱा सुरक्षित असा बोटी लावण्यासाठीचा किनारा आहे. तसेच दुसरे अन्य कोणते ठिकाण नसल्याने येथील मासेमार हे आपल्या बोटींना अडखळ आंजर्ले खाडीतूनच किनार्‍यावर लावण्यासाठी बोटी घेऊन येतात. असा हा मासेमारी बोटी आणण्यासाठीचा तसेच पुन्हा समुद्रात बोटी नेण्यासाठीचा मार्ग पुर्णपणे गाळाने भरला आहे.

टाईम्स स्पेशल

त्यामुळे या साचलेल्या गाळात होड्या रुतण्याचे अनेकदा प्रकार घडलेले आहेत. तसेच बोटी उलटून येथे मासेमारांच्या मृत्यूंच्या दुर्घटनाही घडलेल्या आहेत. त्यामुळे येथील खाडीत साचलेला गाळ काढणे आवश्यक आहे. मात्र गाळ काढला जात नाही, ही खरी शोकांतिका आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg