loader
Breaking News
Breaking News
Foto

गणेशोत्सवानंतर परतीच्या प्रवासासाठी एसटी महामंडळाचे रत्नागिरी विभाग पूर्णपणे सज्ज, २,५०७ गाड्यांचे बुकिंग पूर्ण

रत्नागिरी : गणेशोत्सव साजरा करून मुंबई, ठाणे आणि उपनगरांकडे परतणार्‍या चाकरमान्यांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाचा रत्नागिरी विभाग पूर्णपणे सज्ज झाला आहे. यंदा १९ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत चालवल्या जाणार्‍या परतीच्या जादा गाड्यांसाठी रत्नागिरी विभागातून तब्बल २५०७ गाड्यांचे बुकिंग पूर्ण झाले आहे. गणेशोत्सवानंतर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुखकर आणि वेळेत व्हावा, यासाठी एसटी महामंडळाने विभागातील सर्व नऊ आगारांमधून या जादा बसेसचे विशेष नियोजन केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

एसटी महामंडळाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, गुहागर आगारातून सर्वाधिक ४६० गाड्यांचे बुकिंग झाले असून हे आगार परतीच्या वाहतुकीत आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ चिपळूण आगारातून ४३३ गाड्या, तर देवरूख आगारातून ३४५ गाड्यांचे बुकिंग झाले आहे. दापोली आगारातून २६३, राजापूर आगारातून २३८, खेड आगारातून २३४ आणि रत्नागिरी आगारातून २०० गाड्यांचे बुकिंग पूर्ण झाले आहे. याशिवाय लांजा आगारातून १८७ तर मंडणगड आगारातून १४७ गाड्या परतीच्या प्रवासासाठी आरक्षित झाल्या आहेत. परतीच्या या एकूण प्रवासात २-३ दिवसांचा कालावधी अतिशय गर्दीचा असणार आहे.

टाईम्स स्पेशल

२० सप्टेंबर २०२६ रोजी एकाच दिवशी सर्वाधिक १६६१ गाड्यांचे बुकिंग झाले आहे, ज्यामुळे या दिवशी प्रवाशांची तुफान गर्दी पाहायला मिळेल. त्यानंतर २१ सप्टेंबर रोजी ४५७ गाड्या, तर १९ सप्टेंबर रोजी २३७ गाड्यांचे बुकिंग नोंदवले गेले आहे. २२ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर या कालावधीतही दररोज ५१ ते १९ गाड्यांच्या माध्यमातून प्रवासी प्रवास करणार आहेत. गणेशोत्सवानंतर मुंबईकडे परतणार्‍या भाविकांची कोणतीही अडचण होऊ नये, यासाठी एसटी प्रशासनाने बस स्थानकांवर प्रवाशांची गर्दी नियंत्रण, सुरक्षा आणि अतिरिक्त गाड्यांची व्यवस्था केली आहे. सर्व प्रमुख आगारांमध्ये अधिकारी आणि कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ऐनवेळी प्रवाशांची संख्या वाढल्यास अधिकच्या गाड्या सोडण्याचे नियोजनही प्रशासनाकडून केले जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg