loader
Breaking News
Breaking News
Foto

मुरुड नांदगाव मजगांव येथे गौरी गणपतींचे उत्साहात विसर्जन

कोर्लई,ता.१९(राजीव नेवासेकर)मुरुड पोलीस ठाणे हद्दीतील 2292 गणपती तर 465 गौरीचे विसर्जन ढोल ताशांच्या गजरात फटक्यांची आतिषबाजी करत मंगलमय वातावरणात करण्यात आले.नांदगाव, मजगांव येथे गणपती गौरींचे विसर्जन करण्यात आले. यावेळी नगरपरिषदेच्यावतीने नाकानाक्यावर रोषणाई,गणपती विसर्जन करण्यासाठी १८ लाईफ गार्ड व मेडिसीनची व्यवस्था करण्यात आली होती. मुरुड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली जागोजागी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार, गणपती बाप्पा मोरया.... पुढच्या वर्षी लवकर या, गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. गेल्या सात दिवसांपासून गणेशभक्तांना सकारात्मक ऊर्जा व आनंद देणाऱ्या गणरायाला निरोप देतांना गणेशभक्त हळवे झाले असले तरी त्यांच्या जल्लोषाला उधाण आले होते.शहरातील कोळीवाडा पक्टी येथे २३० गणपती व १५० गौरींचे विसर्जन करण्यात आले.उसळलेला गणेशभक्तांचा महासागर... अशा मंगलमय वातावरणात मुरुड तालुक्यातील मानाच्या गौरी गणपतींचा विसर्जन सोहळा पार पडला. येणाऱ्या जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी बाजारपेठ मित्रमंडळाच्यावतीने येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांना थंड पेयाची सोय करण्यात आली होती. यावेळी पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे व मुख्याधिकारी सचिन बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचारी यांनी विसर्जनस्थळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg