loader
Breaking News
Breaking News
Foto

दोडामार्ग तालुक्यात आपत्ती काळात संपर्क साधण्यासाठी सरकारकडून देण्यात आलेली लाखो रुपये किमंतीची रबर बोट धुळखात

दोडामार्ग, दि. २२ सप्टेंबर प्रतिनिधी : दोडामार्ग तालुक्यात सातत्याने अन्याय केला जात आहे. हा तालुका दूर्गम डोंगराळ म्हणून ओळखला जातो पण येथील आवश्यक सोयीसुविधा याकडे दुर्लक्ष केले जाते. दोडामार्ग तालुक्यात पावसाळ्यात किंवा इतर वेळी नदी पाञात काही घटना घडली पूर आला किंवा कोण बुडाला तर अशा वेळी त्या ठिकाणी जाण्यासाठी दोडामार्ग तालुक्याला रबर बोट देण्यात आली होती. पण मुळातच ही रबर बोट ठिकठिकाणी छिद्र पडल्याने त्यात हवा राहात नाही. यामुळे ही रबर बोट दोडामार्ग पोलीस ठाण्यात धुळखात पडली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दोडामार्ग तालुक्यात दरवर्षी पावसाळ्यात किंवा इतर वेळी काही घटना घडतात यावेळी पाऊस कमी पूर आला नाही. पण ज्या वेळी घोटगेवाडी येथील काॅजवेवरून एक युवक मुलगा वाहून गेला तेव्हा त्यांचा शोध घेण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन याना अशा रबरी बोटीची गरज होती. पण प्रशासनाने दोडामार्ग येथे दिलेली बोट खराब निघाली यामुळे अखेर तिलारी येथील राजेंद्र निंबाळकर यांच्या रबर बोट घेण्याची वेळ आली होती.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg