loader
Breaking News
Breaking News
Foto

देवगड तालुक्यातील गोवळ गावठणवाडी येथील अनिता घाडी या वृद्ध महिलेचा मृतदेह खाडीपात्रात आढळला

देवगड (प्रतिनिधी) - देवगड तालुक्यातील गोवळ गावठणवाडी येथील अनिता बाळकृष्ण घाडी (वय ७७) यांचा मृतदेह रविवारी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास वानिवडे बांधकरवाडी येथील खाडीपात्रात आढळून आला. या घटनेची नोंद देवगड पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू अशी करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिता घाडी यांना दोन मुलगे असून त्यांच्या एका मुलाचे ऑक्टोबर २०२५ मध्ये निधन झाले होते. मुलाच्या निधनानंतर त्यांची मानसिक स्थिती बिघडलेली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दरम्यान, शनिवारी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास त्या घरात कुणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेल्या होत्या. उशिरापर्यंत त्या घरी न परतल्याने त्यांचा शोध घेण्यात आला. परंतु त्या सापडल्या नाहीत. रविवारी दुपारच्या सुमारास वानिवडे पोलीस पाटील गुरुनाथ वाडेकर यांनी वानिवडे बांधकरवाडी येथील खाडीपात्रात एका महिलेचा मृतदेह सापडला असल्याची माहिती देवगड पोलिसांनी दिली.

टाईम्स स्पेशल

तसेच गुरुनाथ वाडेकर यांनी सोशल मीडियावर घटनेची माहिती व सदर महिलेचा फोटो प्रसिद्ध केला होता. ही माहिती घाडी कुटुंबियांपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जात पाहणी केली असता तो मृतदेह अनिता घाडी यांचा असल्याचे देवगड पोलिसांना सांगितले. देवगडचे पोलीस उपनिरीक्षक संदीप खाडे व पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. घटनेची फिर्याद मयत अनिता घाडी यांचा मोठा मुलगा तुषार बाळकृष्ण घाडी (वय ३०) यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली. घटनेचा तपास पोलीस हवालदार आशिष कदम करीत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg