loader
Breaking News
Breaking News
Foto

महामार्गावर बावनदी येथे कारची मोटारसायकलला पाठीमागून धडक; युवक गंभीर जखमी

संगमेश्वर (प्रतिनिधी) - मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर बावनदी, संगमेश्वर येथे रविवारी (१३ सप्टेंबर) सकाळी ११.४५ वाजण्याच्या सुमारास कारने मोटारसायकलला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात मोटारसायकलस्वार तेजस विनायक मेस्त्री (वय २३, रा. वेळवंड, ता. रत्नागिरी) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. रुग्णवाहिकेतून त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी येथे पाठविण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला हलविण्यात आली असून, महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू आहे. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर हेड कॉन्स्टेबल बळीराम शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल रामपुरे, बाबू खोंदल, सटे यांनी घटनास्थळी जावून वाहतूक सुरळीत केली तसेच जखमींला रुग्णवाहिकेने रुग्णालयात पाठवले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg