loader
Breaking News
Breaking News
Foto

शेट्ये कुटुंबाची १२ वी पिढी जपतेय गणेशोत्सवाचा वारसा; झिम्मा-फुगडीने रंगते मैफल, मध्यरात्री गौरीची आरती

संगमेश्वर (सत्यवान विचारे) - मोबाईलच्या युगात माणसं जवळ असूनही नात्यांमधील अंतर वाढत असताना, संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथील शेट्ये कुटुंबाने तब्बल १५२ वर्षांपासून एकोप्याची अनोखी परंपरा जपली आहे. तब्बल २५ घरांना एका धाग्यात बांधणारा हा गणेशोत्सव आज १२ व्या पिढीपर्यंत पोहोचला असून, ‘२५ घरे, १२ पिढ्या आणि एकच बाप्पा’ हे या उत्सवाचे वैशिष्ट्य ठरले आहे. दीडशे वर्षांपूर्वी सुरू झालेली ही परंपरा काळाच्या ओघात अधिकच समृद्ध झाली. पिढ्या बदलल्या, जीवनशैली बदलली, अनेक कुटुंबीय रोजगार-व्यवसायानिमित्त विविध ठिकाणी स्थायिक झाले; मात्र गणपती बाप्पाच्या निमित्ताने संपूर्ण शेट्ये कुटुंब एकत्र येण्याची परंपरा आजही अखंड आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

वर्षभर विविध ठिकाणी राहणारे कुटुंबीय गणेशोत्सवासाठी धामणीत एकत्र येतात. घरातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन, महिलांचा उत्साह, तरुणाईची लगबग आणि चिमुकल्यांचा उत्साह यामुळे संपूर्ण परिसरात उत्सवी वातावरण निर्माण होते. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक विधी न राहता कुटुंबातील नाती घट्ट करणारा सोहळा बनला आहे. शेट्ये कुटुंबाच्या गणेशोत्सवातील विशेष आकर्षण म्हणजे महिलांची झिम्मा-फुगडीची मैफल. आधुनिक मनोरंजनाच्या युगातही पारंपरिक खेळांचा हा वारसा जपला जात आहे. चिमुकल्या मुलींपासून ज्येष्ठ महिलांपर्यंत सर्वजणी झिम्मा-फुगडीच्या फेरात सहभागी होतात. त्यामुळे नव्या पिढीला आपल्या पारंपरिक संस्कृतीची ओळखही होते. गौरी आगमनाचा दिवस शेट्ये कुटुंबासाठी विशेष महत्त्वाचा असतो. रात्री बारा वाजता संपूर्ण कुटुंबाच्या उपस्थितीत गौरीची आरती केली जाते. या वेळी घरातील प्रत्येक पिढी एकत्र येते. भक्तिमय वातावरणात होणारी ही आरती कुटुंबातील एकोप्याचे दर्शन घडविणारा भावनिक क्षण ठरतो.

टाईम्स स्पेशल

या उत्सवाचे वैशिष्ट्य केवळ दीर्घ परंपरेत नाही, तर एका गणेशोत्सवाच्या माध्यमातून अनेक पिढ्यांमधील नाते जिवंत ठेवण्यात आहे. ज्येष्ठ मंडळी जुन्या आठवणी आणि परंपरा सांगतात, मधली पिढी त्या पुढे नेते, तर तरुणाई उत्सवाला नवा उत्साह देते. चिमुकल्यांना लहानपणापासूनच कुटुंब, संस्कार आणि परंपरेची शिकवण मिळते. १५२ वर्षांचा हा प्रवास म्हणजे केवळ एका गणेशोत्सवाची परंपरा नसून शेट्ये कुटुंबाच्या एकोप्याचा, श्रद्धेचा आणि संस्कारांचा जिवंत इतिहास आहे. आज विभक्त कुटुंबपद्धती वाढत असताना ‘कुटुंबाला एकत्र ठेवणारी शक्ती काय?’ याचे प्रत्यक्ष उदाहरण धामणीतील शेट्ये कुटुंबाचा गणेशोत्सव देत आहे. २५ घरे, १२ पिढ्या आणि एकच बाप्पा, हीच या कुटुंबाची खरी श्रीमंती आहे. गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषासोबत १५२ वर्षांपासून जपलेली ही एकोप्याची परंपरा यंदाही नव्या पिढीकडे सुपूर्द होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

१५२ वर्षांची अखंड परंपरा! २५ घरांचा एकच बाप्पा

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg