loader
Breaking News
Breaking News
Foto

बापर्डे येथे ‘सेवा संकल्प अभियानाचा’ शुभारंभ; शासकीय योजनांचा लाभ ग्रामस्तरावर पोहोचविण्यासह लोकसहभाग वाढविण्यावर भर

देवगड(प्रतिनिधी)- पंचायत समिती देवगड व ग्रामपंचायत बापर्डे यांच्या संयुक्त विद्यमाने बापर्डे येथे ‘सेवा संकल्प अभियानाचा’ शुभारंभ पंचायत समिती देवगडचे सभापती गणेश राणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी निलेश जगताप, बापर्डेचे सरपंच संजय लाड, विस्तार अधिकारी ग्रा.प. दिपक तेंडुलकर, तालुका व्यवस्थापक हेमंत हळदणकर, ग्राममहसुल अधिकारी प्रविण वळंजु, ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र वेद्रुक, पोलीस पाटील नितीन नाईकधुरे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात सभापती गणेश राणे, गटविकास अधिकारी निलेश जगताप व सरपंच संजय लाड यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी सेवा संकल्प अभियानाचा उद्देश स्पष्ट करत नागरिकांना विविध शासकीय सेवा व योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संवैधानिक पदावरील कारकिर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत सेवा संकल्प अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय सेवा व योजनांचा लाभ उपलब्ध करून देणे, लोकसहभाग वाढविणे, ग्रामस्तरावर लोकाभिमुख उपक्रम राबविणे तसेच विकासकामांना गती देणे, ही प्रमुख उद्दिष्टे आहेत. तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत ग्रामपंचायतींच्या सर्वांगीण विकासासाठी निश्चित करण्यात आलेल्या विविध बाबींच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सेवा संकल्प अभियानाचा कालावधी विशेष कृती कालावधी म्हणून उपयोगात आणण्यात येणार आहे. या माध्यमातून ग्रामपंचायत स्तरावर विविध लोकाभिमुख व सेवाभावी उपक्रम राबवून नागरिकांना शासकीय सेवांचा लाभ अधिक सुलभतेने मिळवून देण्यावर भर देण्यात येणार आहे.

टाइम्स स्पेशल

देवगड तालुक्यातील ७२ ही ग्रामपंचायत मध्ये सेवा संकल्प अभियान राबवण्याबाबत नियोजनही गटविकास अधिकारी निलेश जगताप यांच्या मार्गदर्शनखाली करण्यात आले. या उपक्रमाचा तालुकास्तरीय शुभारंभ बापर्डेमध्ये करण्यात आला. बापर्डे येथील कार्यक्रमाची प्रस्तावना व सूत्रसंचालन ग्रामपंचायत विस्तार अधिकारी दीपक तेंडुलकर यांनी केले, तर आभार बापर्डेचे सरपंच संजय लाड यांनी मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg