loader
Breaking News
Breaking News
Foto

लग्नाचे आमिष दाखवून शारिरीक संबध, त्यानंतर हात झटकले; पिडीत तरुणीची जयगड सागरी पोलीस ठाण्यात तक्रार ;;झरेवाडीतील तरुणाला पोलीस कोठडी

रत्नागिरी : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीशी शारिरीक संबध ठेवून लग्नाला नकार देणाऱ्या आरोपी तरुणाला तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. साहील प्रविण कळंबटे वय २७ राहणार झरेवाडी, गोताडवाडी असे आरोपीचे नाव आहे. आरोपीला गुरुवारी अटक करुन न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपी तरुणाने फिर्यादी तरुणीशी मैत्री करुन जानेवारी आणि मार्च महिन्यामध्ये गणपतीपुळे येथे फिरण्यास नेले. येथील लॉजवर नेवून तिच्याशी शारिरीक संबध प्रस्थापित केले. लग्न करताे असे सांगून गोड बोलून शारिरीक संबध ठेवून त्‍या तरुणीचे नग्नावस्थेत फोटोही काढून घेतले. तरुणीने त्‍यानंतर वारंवार लग्न करण्यासाठी तगादा लावला. परंतू तरुणाने लग्न करण्याची इच्छा नसल्याचे सांगितले. त्‍यामुळे त्‍या पिडीत तरुणीने जयगड सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीसानी गुन्हा दाखल करुन तरुणाला अटक केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आरोपी तरुणाने फिर्यादी तरुणीशी मैत्री करुन जानेवारी आणि मार्च महिन्यामध्ये गणपतीपुळे येथे फिरण्यास नेले. येथील लॉजवर नेवून तिच्याशी शारिरीक संबध प्रस्थापित केले. लग्न करताे असे सांगून गोड बोलून शारिरीक संबध ठेवून त्‍या तरुणीचे अवस्थेत फोटोही काढून घेतले. तरुणीने त्‍यानंतर वारंवार लग्न करण्यासाठी तगादा लावला. परंतू तरुणाने लग्न करण्याची इच्छा नसल्याचे सांगितले. त्‍यामुळे त्‍या पिडीत तरुणीने जयगड सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीसानी गुन्हा दाखल करुन तरुणाला अटक केली. आरोपी तरुणाला न्यायालयात हजर करण्यात आले. विशेष सहाययक सरकारी वकील निलांजन नाचणकर यांनी आरोपीची वैद्यकिय तपासणीसाठी, तरुणीचे काढलेले नग्न फोटो हस्तगत करण्यासाठी त्‍याचबरोबर या गुन्हयात कोणाचे सहकार्य झाले आहे का? याचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने आरोपी साहील कळंबटेला तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg