loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबई येथून गावी आलेल्या 'सागर धर्णे' या तरूणांचा हदय विकाराच्या झटक्याने निधन; साटेली भेडशी परिसरात हळहळ

दोडामार्ग(प्रतिनिधी) - साटेली भेडशी गावातील रहिवासी तसेच गेली अनेक वर्षे नोकरी व्यवसाय निमित्ताने मुंबई येथे वास्तव्य करून राहाणारा विवाहित तरुण सागर लक्ष्मण धर्णे वय वर्षे ५२ हा गणेश चतुर्थी निमित्ताने गावी आला होता. त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागले. यातच त्याला हदय विकाराचा झटका आला. त्याला तातडीने गोवा येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले होते, मात्र उपचार दरम्यान शुक्रवारी पहाटे निधन झाले. त्याच्या या निधनामुळे साटेली भेडशी परिसरात शोककळा पसरली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

साटेली भेडशी खैराटवाडी येथील सागर धर्णे गेल्या अनेक वर्षापासून मुंबई येथे बायको मुलांसह राहातो. दरवर्षी गणेश चतुर्थी तसेच शिमगोत्सव दरम्यान गावी येतात. सागर धर्णे हा चांगला तसेच मनमिळाऊ होता. सर्वात मिळून मिसळून राहायचा. मुंबईमध्ये साटेली ग्रामस्थ मंडळ वतीने विविध कार्यक्रम यात सहभागी असायचा. गणेश चतुर्थी दोन दिवस अगोदर तो बायको मुलांसह घरी आला होता. घरात रंगरंगोटी तसेच गणेश मूर्ती प्रतिष्ठापना केली होती.

टाइम्स स्पेशल

एका नातेवाईकांला बघण्यासाठी गोवा येथे गेला असता त्या ठिकाणी त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि खाली कोसळला लगेच उपचार केले पण शुक्रवारी पहाटे हदय विकाराचा झटका आला आणि यातच त्याचे निधन झाले. त्याच्या निधनाची वार्ता गावात पसरताच अनेकांना धक्का बसला आणि गावात शोककळा पसरली. साटेली भेडशी गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याची ही गणेश चतुर्थी शेवटची ठरली. त्याच्या पश्चात आई, भाऊ, भावजय, पत्नी, मुले, असा परिवार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg