loader
Breaking News
Breaking News
Foto

बरकत मुकादम यांची मजगाव तंटामुक्त समिती अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सर्वस्तरातून अभिनंदन

रत्नागिरी : गावातील शांतता, सलोखा, एकोपा आणि बंधुभाव कायम ठेवण्यासाठी तंटामुक्त समितीचे पद अत्यंत महत्त्वाचे आहे. या जबाबदारीसाठी बरकत मुकादम यांची निवड होणे ही गावासाठी निश्चितच अभिमानाची बाब आहे. बरकत मुकादम यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सरपंच म्हणून गावाच्या विकासासाठी आणि सामाजिक कार्यासाठी योगदान दिले आहे. गावातील विविध प्रश्न समजून घेऊन ते सर्वांना सोबत घेऊन मार्ग काढण्याचा नेहमीच प्रयत्न करत आले आहेत. त्यांच्या अनुभवाचा आणि सर्वांशी असलेल्या आपुलकीच्या संबंधांचा निश्चितच तंटामुक्त अध्यक्ष म्हणून मोठा फायदा होईल,गावातील ग्रामस्थांनी म्हटले आहे . त्यांची मजगाव तंटामुक्त समिती अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शोएब नाकाडे ताजुद्दीन खल्पे शाहीद सावकार इस्माईल नाकाडे जमीर नाकाडे हमीद मालगुणकर फुजील इब्जी यांनी अभिनंदन केले आहे .

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यांच्या नेतृत्वाखाली गावातील वाद-विवाद सामंजस्याने सोडवले जातील आणि गावात शांतता, एकोपा व बंधुभाव अधिक दृढ होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.बरकत मुकादम यांचे निवडीबद्दल यांचे सर्वस्तरांतून अभिनंदन केले जात आहे

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg