loader
Breaking News
Breaking News
Foto

स्वच्छ सागर सुरक्षित सागर 5.0 अभियान मध्ये देवगड जामसंडे नगरपंचायती मार्फत देवगड समुद्र किनारी साफसफाई मोहीम

देवगड (प्रतिनिधी) - सागरी किनारे हे सागरी जीव व मानव जातीला निसर्गाने एक अदभुत दिलेली दैवी देणगी आहे. सागरी किनार्‍या बरोबर जलाशयाचे साठे स्वच्छ निर्मळ ठेवण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत. असे आवाहनात्मक प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत यांनी केले. राष्ट्रीय सागरी किनारा अभियान अंतर्गत स्वच्छ सागर सुरक्षित सागर ५.० अभियान मध्ये देवगड समुद्री किनारा देवगड-जामसंडे नगरपंचायती मार्फत साफसफाई मोहीम पार पडली. यावेळी प्रमोद कामत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार अ‍ॅड अजितराव गोगटे, नगराध्यक्षा साक्षी प्रभू, उपनगराधक्षा मिताली कदम. जिल्हाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर, उपमुख्यकारीकारी अधिकारी जयप्रकाश परब, सभापती गणेश राणे उपसभापती अमोल लोके, नायब तहसिलदार विवेक शेठ, गटविकास अधिकारी निलेश जगताप, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी हरिदत्त माने, केंद्रीय पर्यावरण अधिकारी भवर व अन्य मान्यवर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सागरी किनार्‍यावर केवळ एक दिवस कचरा साफसफाई करून चालणार नाही, असे सांगून प्रमोद कामत यांनी त्यासाठी समाजातील सर्वच घटकांनी सामूहिकपने ही जबाबदारी घेतली पाहिजे. प्लास्टिक कचरा, घाण, व ईतर अनावश्यक वस्तूंची साफसफाई करून सागरी किनारे स्वच्छ व सुरक्षित ठेवले पाहिजेत. केवळ किनारे स्वच्छ न ठेवता स्वच्छ पाणी देखील आपली गरज असून तलाव, जलाशयाचे सर्व स्तोत्र देखील कसे स्वच्छ राहतील. यादृष्टीने आपले सर्वांचे प्रयत्न महत्त्वाचे आहेत असेही ते यावेळी म्हणाले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर यांनी कोकण किनारपट्टीवरील प्रमुख सागरी किनारपट्टीमध्ये देवगड तालुक्यात देवगड, कुणकेश्वर, विजयदुर्ग हे पर्यटन दृष्ट्या प्रमुख किनारे आहेत. अश्या अभियानातून हे किनारे स्वच्छ व सुरक्षित राहण्यासाठी आपल्या सेवाभावी संस्था, मंडळांचा सहभाग महत्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.

टाईम्स स्पेशल

नगरपंचायतीचे मुख्याधिकारी हरिदत्त माने यांनी आपल्या प्रास्तविकात उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून त्यांनी सागरी किनारे स्वच्छ ठेवण्यासाठी सन २०१६ पासून विशेष प्रयत्न केले जात असून हे पाचवे पर्व आहे. देवगड तालुक्यात एकूण १४ सागरी किनारे आहेत. देवगड समुद्री किनारी नगरपंचायतीच्या माध्यमातून सातत्याने सफाई हाती घेतली जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी नगरपंचायतीच्या सेल्फी पॉइंटचे, व एक पेड मां के नाम या अभियानाचा शुभारंभ करण्यात येऊन मान्यवरांचे हस्ते समुद्र किनारी झाडे लावण्यात आली. या अभियानाला देवगड मत्स्यव्यवसाय परवाना अधिकारी किरण वाघमारे, मंडळ अधिकारी विनायक शेट्ये, सहाय्यक महसूल अधिकारी दीपक पावसकर, रोटरी क्लबचे नरेंद्र डामरी, अनुश्री पारकर, शिवप्रसाद पेडणेकर, जामसंडे येथील आयटीआय चे शिक्षक, विद्यार्थी, सागर रक्षक, मत्स्यव्यवसाय खात्याचे कर्मचारी तसेच नगरपंचायतीचे कर्मचारी, त्याचप्रमाणे नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळी ९ ते ११ किनार्‍यावरील प्लास्टिक कचरा, घाण व अनावश्यक वस्तू गोळा करून किनारा स्वच्छ करण्यात आला. यावेळी किनारा स्वच्छतेबाबत सामूहिक शपथ घेण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg