loader
Breaking News
Breaking News
Foto

गणेशोत्सवात CNG चा ठणठणाट, खेडमध्ये CNG पंपांवर दीड-दोन किमी रांगा

खेड - कोकणातील प्रमुख सण असलेल्या गणेशोत्सवासाठी लाखो चाकरमानी मुंबई-पुण्यातून आपल्या गावाकडे दाखल होत आहेत. मात्र कोकणात पोहोचल्यानंतरही त्यांच्या अडचणी काही संपताना दिसत नाहीत. मुंबईतून कोकणात येण्यासाठी आठ ते दहा तास किंवा त्याहून अधिक काळ प्रवास केल्यानंतर आता चाकरमान्यांना CNG भरण्यासाठी पुन्हा तब्बल आठ ते दहा तास रांगेत उभं राहावं लागत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील सर्वच CNG पंपांवर वाहनांच्या अक्षरशः दीड ते दोन किलोमीटर लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

CNGचा साठा संपल्यानंतर पुन्हा गॅस उपलब्ध होण्यासाठी तासनतास प्रतीक्षा करावी लागत असल्याने वाहनचालक आणि प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. गणेशोत्सवासाठी उत्साहाने कोकणात दाखल झालेल्या चाकरमान्यांना आता आपल्या गावात आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्याऐवजी CNG पंपावरच तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात ‘गावी कमी आणि CNG पंपावरच जास्त वेळ’ अशी संतापजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg