मालवण (प्रतिनिधी) - मालवण तालुक्यातील वेरळ गावात परप्रांतीय फेरीवाल्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांचे नुकसान होत असून त्यांच्यामुळे सुरक्षेचा व आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे वेरळ गावात फिरणाऱ्या सर्व परप्रांतीय आणि अनधिकृत फेरीवाल्यांवर तात्काळ कायदेशीर बंदी घालून त्यांना गावातून हटविण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून वेरळ ग्रामपंचायतीकडे करण्यात आली असून कारवाई न झाल्यास मनसे स्टाईल आंदोलन छेडून फेरीवाल्याना हुसकावून लावण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. मनसे वेरळ शाखेच्या कार्यकर्त्यांकडून वेरळ ग्रामपंचायतीचे सरपंच धनंजय परब यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी मनसे वेरळ शाखा अध्यक्ष प्रसाद मेस्त्री, पदाधिकारी मंगेश परब, सचिन परब, धनंजय परब, दत्ता परब, अनिल परब, प्रमोद परब, अमोल परब आदी उपस्थित होते.
गेल्या काही दिवसांपासून वेरळ ग्रामपंचायत हद्दीत आणि मुख्य बाजारपेठ परिसरात परप्रांतीय फेरीवाल्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. हे फेरीवाले कोणत्याही प्रकारचा अधिकृत परवाना किंवा ग्रामपंचायतीची परवानगी न घेता अनधिकृतपणे व्यवसाय करत आहेत. यामुळे काही गंभीर समस्या निर्माण होत आहेत. विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या या परप्रांतीय फेरीवाल्यांमुळे वर्षानुवर्षे कर भरणारे स्थानिक भूमिपुत्र आणि मराठी व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर गदा आली आहे. हे परप्रांतीय फेरीवाले नेमके कुठून आले आहेत, त्यांची पार्श्वभूमी काय आहे, याची कोणतीही नोंद ग्रामपंचायतीकडे किंवा स्थानिक पोलिसांकडे उपलब्ध नाही. यामुळे गावातील कायदा व सुव्यवस्थेचा आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तसेच व्यवसायानंतर उरलेला कचरा रस्त्यावरच टाकला जात असल्याने आरोग्याचा प्रश्न गंभीर होत आहे.
गावातील व्यवसायांवर पहिला हक्क हा स्थानिक मराठी माणसाचाच असायला हवा हि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ही ठाम भूमिका आहे. त्यामुळे वेरळ ग्रामपंचायत हद्दीत फिरणाऱ्या सर्व परप्रांतीय आणि अनधिकृत फेरीवाल्यांवर तात्काळ कायदेशीर बंदी घालावी. तसेच त्यांची कसून चौकशी करून त्यांना गावातून हटवण्यात यावे. याबाबत प्रशासनाने त्वरित कारवाई न केल्यास, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या स्टाईलने आंदोलन छेडेल आणि परप्रांतीय फेरीवाल्यांना हुसकावून लावेल, असा इशारा मनसेकडून या निवेदनातून देण्यात आला आहे.







































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.