loader
Breaking News
Breaking News
Foto

कोन्हवली येथे सलग दोन दिवस दुचाकी अपघात; अभिजीत देवळेकर यांची तत्काळ मदत

मंडणगड (प्रतिनिधी) : मंडणगड तालुक्यातील कोन्हवली परिसरात सलग दोन दिवस दुचाकी अपघाताच्या घटना घडल्या. या दोन्ही घटनांमध्ये भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर यांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पोहोचविण्यासाठी पुढाकार घेतला. १९ सप्टेंबर २०२६ रोजी कोन्हवली येथे दोन युवतींचा दुचाकी अपघात झाला. या अपघातात सपना पानवलकर व नम्रता सुर्वे या दोघी जखमी झाल्या. अपघाताची माहिती मिळताच अभिजीत देवळेकर यांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. जखमी युवतींना देव्हारे येथील पुरुषोत्तम शिंदे यांच्या क्लिनिकमध्ये प्राथमिक उपचार मिळवून दिल्यानंतर पुढील उपचारासाठी मंडणगड येथील श्रद्धा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्राथमिक उपचारानंतर दोन्ही युवतींना पुढील उपचारासाठी मुंबई-अंधेरी येथे हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी जिजाऊ संस्थेच्या रुग्णवाहिका सेवेचा संपर्क करण्यात आला. संस्थेचे रुग्णवाहिका चालक मनोज पार्टे व निलेश रक्ते यांनी तत्काळ प्रतिसाद देत दोन्ही जखमी युवतींना मुंबई-अंधेरी येथे सुरक्षितपणे पोहोचविले. सध्या दोन्ही युवतींवर अंधेरी येथे पुढील उपचार सुरू आहेत. दरम्यान, आज २० सप्टेंबर २०२६ रोजी मंडणगडहून बाणकोटच्या दिशेने कामानिमित्त जात असताना कोन्हवली येथे पुन्हा एका दुचाकीस्वाराचा दुचाकी घसरून अपघात झाला. या घटनेची माहिती मिळताच अभिजीत देवळेकर यांनी तत्काळ मदत केली. जखमी व्यक्तीला प्राथमिक उपचार मिळावेत यासाठी खाजगी वाहनाची व्यवस्था करून त्यांना देव्हारे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी पाठविण्यात आले.

टाईम्स स्पेशल

सलग दोन दिवस घडलेल्या अपघातांमध्ये जखमींना वेळेत वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी तत्परतेने मदत करणारे अभिजीत देवळेकर, बबन दुर्गवले, हितेश बैकर तसेच जिजाऊ संस्थेचे रुग्णवाहिका चालक मनोज पार्टे व निलेश रक्ते यांच्या कार्याचे परिसरातून कौतुक होत आहे. अपघातग्रस्तांना संकटकाळात तातडीने मदत करून उपचारासाठी पोहोचविण्याच्या या प्रयत्नातून सामाजिक बांधिलकी आणि मानवतेचे दर्शन घडले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg