loader
Breaking News
Breaking News
Foto

गणपती बाप्पा मोरया..., पुढल्या वर्षी लवकर...चा गजर करत गिम्हवणे दुबळे वाडीतील गौरी गणपतींचे भक्तिभावाने विसर्जन

दापोली (प्रतिनिधी) : गणपती बाप्पा मोरया..., पुढल्या वर्षी लवकर या ..., गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला चा गजर करत टाळ मृदंग, लेझीम, पारंपरिक ढोल सनई टिमकी खालूबाजाच्या ठेक्यावर ताल धरत वाजत गाजत नाचत विसर्जन मिरवणूकीने गौरी गणपतींना गिम्हवणे दुबळेवाडी येथून वाहणाऱ्या नदी पात्रात श्री गणपती बाप्पांसह गौरींचे मोठ्या भक्तिभावाने विसर्जन करण्यात आले. कोकणातील लोक हे उत्सवप्रिय लोक आहेत. सांस्कृतिक, धार्मिक सण उत्सव साजरा करण्याची येथील परंपरेला अनन्यसाधारण असे महत्व आहे. आणि म्हणूनच कोकणातील लोक ऋण काढतील पण सण साजरे करतील, असे म्हटले जाते. ईतके ते उत्सवप्रिय लोक आहेत. गौरी गणपती हा कोकणातील तसा मोठा सण अशा या गौरी गणपती सणाची खरी सुरुवात ही भाद्रपद चतुर्थीला श्री गणरायांच्या प्रतिष्ठापनेने होते. त्यानंतर महालक्ष्मी किंवा ज्येष्ठा गौरीचं गौरी म्हणजे संपन्नतेचे, समृद्धीची देवता. घरात सुखशांती नांदावी म्हणून प्राचीन काळापासून घराघरात गौरीपूजन केले जाते. माहेरवाशीण घरी येते त्यामुळे महिला गौरीपूजनाची आतुरतेना वाट पाहत असतात.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

भाद्रपद पक्षातील अनुराधा नक्षत्रावर गौरीचं आगमन होतं. गौरीच आवाहन अनुराधा नक्षत्रावर, पूजन ज्येष्ठा नक्षत्रावर तर विसर्जन मुळ नक्षत्रावर केलं जातं. त्यानुसार गणारायांची प्रतिष्ठापना भाद्रपद चतुर्थीला म्हणजेच सोमवारी १४ सप्टेंबर रोजी करण्यात आली. त्यानंतर दिड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन दुसऱ्या दिवशी मंगळवारी १५ सप्टेंबर रोजी करण्यात आले. त्यानंतर जेष्ठा गौरींचे आवाहन अनुराधा नक्षत्रावर गुरुवारी १७ सप्टेंबर रोजी करण्यात आले आणि शुक्रवारी १८ सप्टेंबर रोजी मोठ्या आनंदात जेष्ठा गौरींचे पूजन करण्यात आले. तर शनिवारी १९ सप्टेंबर रोजी गिम्हवणेत गौरी गणपतींचे विसर्जन करण्यात आले. दापोली तालुक्यात काही ठिकाणी समुद्राच्या पाण्यात काही ठिकाणी नदीपात्रातील डोहात काही ठिकाणी त्यांमध्ये तर काही ठिकाणी विहीरींमध्ये विसर्जन केले जाते. गावा गावात पाण्याच्या सोयीच्या उपलब्धेनुसार गौरी गणपतींचे विसर्जन करण्यात येते. तसे शनिवारी दापोली तालुक्यातील गिम्हवणे येथील अमृतेश्वर मंदिराच्या विहीरीत गिम्हवणे गावातील आझाद वाडी, उगवत वाडी तसेच सुतारवाडी येथील गणपतींचे विसर्जन करण्यात आले. तर अमृतेश्वर मंदिराच्या समोरुनच वाहणा-या नदीच्या पात्रात गौराईंचे विसर्जन करण्यात आले.

टाईम्स स्पेशल

गिम्हवणे येथील आझाद वाडी, उगवत वाडी, सुतार वाडीतील रहिवाशांनी ढोल, सनई, टिमकि वाद्यांच्या तालावर नाचत..., बेंजो वाद्यांच्या सुरातील गाण्यांवर थिरकत ..., ढोलकी वाजवत टाळ कुटत भक्तिभावाच्या गजरात आप आपल्या वाड्यांमधून विसर्जन स्थळी मिरवणुकिने गौरी गणपतींना आणले. यावेळी उधळण्यात आलेला गुळाल, वाद्यांच्या निनादणारा गजर तसेच गायल्या गेलेल्या भजनांनी गिम्हवणे परिसर पूर्णतः भक्तिमय झाला होता. सायंकाळी उशिरा गौरी गणपतींना जड अंतःकरणाने निरोप देत त्यांचे विसर्जन करण्यात आले. अतिशय शिस्तबद्ध विसर्जन मिरवणूक आणि निर्माण झालेला भक्तीमय भावाने गिम्हवणे परिसर पूर्णपणे भक्तीरसात न्हावून निघाले होते. तर गिम्हवणे दुबळे वाडी येथील श्री गणपतींसह गौराईंचे वाजत गाजत नाचत दुबळे वाडीतून वाहणाऱ्या नदी ठीकाणी मोठ्या उत्साहात श्री गणेश घाटावर विसर्जन करण्यासाठी आणले गेले. तेथे महाआरती चा कार्यक्रम पार पडल्यानंतर श्रींसह गौराईंचे विसर्जन करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg