loader
Breaking News
Breaking News
Foto

राष्ट्रवादी काँग्रेस आणी भास्कर दाजी फौंडेशनच्या वतीने गणेश विसर्जन घाटांवर चार्जिंग एलईडी दिव्यांचे वाटप

म्हसळा : गणेशोत्सवानिमित्त गणेश विसर्जन घाटांवर भाविकांना रात्रीच्या वेळी प्रकाशाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हसळा तालुका आणि भास्कर दाजी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विविध गणेश विसर्जन ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य अभिषेक विचारे यांचा हस्ते चार्जिंग एलईडी दिव्यांचे वाटप करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली, महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांच्या संकल्पनेतून आणि आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गणेश विसर्जनाच्या वेळी सायंकाळनंतर आवश्यक प्रकाशव्यवस्था उपलब्ध होऊन भाविक व ग्रामस्थांना विसर्जन प्रक्रिया सुलभतेने पार पाडता यावी, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या उपक्रमावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष समीर बनकर, पंचायत समिती सभापती बबन मनवे, उपसभापती लहु म्हात्रे, आंबेत गण अध्यक्ष संतोष नाना सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस युवक तालुका अध्यक्ष किरण पालांडे, माजी उपसभापती संदीप चाचले, गटविकास अधिकारी साळी यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी, मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg