रत्नागिरी - पुण्यातील विद्यानंद बापट हे सध्या मोठे चर्चेतले नाव आहे. डीजे, डॉल्बी सिस्टमवर बंदी हा त्यांच्या मागणीचा मुख्य मुद्दा आहे व तो अनेकांनी उचलून धरला आहे. हाच मुद्दा पुणे महानगरपालिकेच्या झालेल्या सभेत विद्यानंद बापट यांनी मांडला. काहींनी त्यांच्या मुद्द्याला विरोध केला पोलिसांनी सुरक्षित वातावरणात त्याला बाहेर काढलं आणि तेव्हापासूनच विद्यानंद बापट हे नाव अवघ्या महाराष्ट्राला माहिती झालं. विद्यानंद बापट यांचे मराठी, संस्कृत व इंग्रजी भाषेवर असलेली त्यांची जबरदस्त कमांड त्याला माहिती असलेले संदर्भ यावरून त्यांच्या विद्वत्तेची जाणीव समोरच्याला झाल्याशिवाय राहत नाही. मात्र मूळचे कोकणातील रत्नागिरी गोळप येथील असलेले विद्यानंद बापट यांच्यातील गुणवत्ता ओळखून त्यांच्या गुणवत्तेचा गौरव तब्बल २२ वर्षांपूर्वीच म्हणजेच २००४ साली रत्नागिरीकरांनी तत्कालीन राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष, विद्यमान आमदार तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते केला होता. रत्नागिरी तालुक्यातील गोळप पंचशीलनगर येथे आदर्श युवक मंडळातर्फे राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम घेण्यात आला होता.
दहावी व बारावी तसेच उच्चशिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला होता. मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष अविनाश काळे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे तत्कालीन प्रदेश चिटणीस स्वर्गीय कुमार शेट्ये, गोळपच्या तत्कालीन सरपंच अस्मिता गोरे, उषा काळे, तत्कालीन ग्रा. पं. सदस्य नारायण आग्रे, केशव पालकर, बी.के.पालकर, महेश भाटकर, प्रदीप डोंगरे, कै.दिलीप पावसकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला होता. इयत्ता नववी पर्यंत शिक्षण पुण्यात न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग येथे झाले. त्यानंतर त्यांचे शिक्षण रत्नागिरी येथील फाटक हायस्कूल मध्ये झाले. महाविद्यालयीन शिक्षण रत्नागिरी येथील गोगटे कॉलेजमध्ये झाले बी. कॉम. मध्ये महाविद्यालयात विद्याधर बापट हे मेरिटमध्ये तिसर्या क्रमांकावर चमकले होते. त्यानंतर त्यांनी एम.कॉम. पर्यंत शिक्षण पूर्ण केले. सी.ए.ची परीक्षा दिली अशी माहिती विद्याधर यांचे वडील सुहास बापट यांनी दिली. पुण्यातून कोकणात हे कुटुंब आल्यानंतर बापट यांचे प्राथमिक शिक्षण फाटक हायस्कूलमध्ये झाले मात्र त्यांची गुणवत्ता हुशारी अभ्यासवृत्ती प्रचंड वाचन व आकलन शक्ती याचा अंदाज तत्कालीन शिक्षक व ग्रामस्थ यांना तेव्हाच आला होता. त्यामुळेच सत्कार कार्यक्रमात गुणवंतांच्या यादीत अर्थातच विद्यानंद बापट यांचेही नाव होते.
गोळप येथे गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराच्या या कार्यक्रमाच्या बातम्या व फोटो स्थानिक वृत्तपत्रांमधून प्रसिद्धही झाल्या होत्या. इयत्ता दहावीच्या निकालात विद्यानंद हे चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाले होते. त्यामुळे अर्थातच त्यांचे गुणवंत विद्यार्थ्यांच्या यादीत नाव होत. त्यावेळी झालेल्या गुणवंत विद्यार्थी गौरवाच्या बातम्या आता व्हायरल झाल्या आहेत. विद्यानंद बापट यांच्या या बातमीची कात्रण व फोटो मोठ्या कौतुकाने सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे बापटांची हुशारी विद्वत्ता ही लहानपणापासूनच आहे व त्याची दखल रत्नागिरीकरांनी गोळपवासीयांनी तेव्हाच घेतली होती, असं म्हटल्यास वावगे होणार नाही. एस एम जोशी यांचे मूळ गाव असलेलं गोळप हे गाव आता पुन्हा एकदा चर्चेत आल आहे. ते विद्यानंद बापट यांनी पुण्यात घेतलेली रोखठोक व रास्त भूमिका व त्याच अनेकांनी केलेल्या कौतुक यामुळे.































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)

































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.