loader
Breaking News
Breaking News
Foto

कर्ली नदीत होडी उलटून तरुणाचा बुडून मृत्यू!

मालवण(प्रतिनिधी) - मालवण तालुक्यातील आंबेरी-वाकवाडी येथील कर्ली नदीपात्रात शेतीच्या कामासाठी होडीतून जात असताना होडी उलटून झालेल्या दुर्घटनेत मुंबईतील दर्शन चंद्रकांत टकारिया (३५) यांचा बुडून मृत्यू झाला. ही दुर्घटना आज सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास घडली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दर्शन टकारिया हे गणेशोत्सवानिमित्त पत्नी श्वेता टकारिया व कुटुंबीयांसह आंबेरी-वाकवाडी येथील सासरवाडीला आले होते. दर्शन यांच्यासह श्वेता टकारिया, प्रणल वाक्कर आणि होडीचालक स्वप्नील वाक्कर हे नदीपलीकडे शेतीच्या कामासाठी जात असताना अचानक होडी उलटली. चौघेही नदीच्या पाण्यात पडले. होडीचालक स्वप्नील वाक्कर यांनी प्रसंगावधान राखत दोन महिलांना सुरक्षितपणे नदीकाठावर आणले. मात्र, दर्शन टकारिया पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेले.

टाइम्स स्पेशल

घटनेची माहिती मिळताच मालवण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक शेलार, सहायक पोलीस निरीक्षक गणेश माने यांच्यासह पोलिसांनी पाहणी करून शोधमोहीम सुरू केली. स्थानिक ग्रामस्थ तसेच स्कुबा डायव्हिंग बचाव पथकाने नदीपात्रात शोध घेतला. अखेर दर्शन टकारिया यांचा मृतदेह सापडला. मृतदेह शवविच्छेदनासाठी मालवण ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. दर्शन टकारिया यांच्या पश्चात पत्नी व अवघा तीन वर्षांचा मुलगा आहे. गणेशोत्सवासाठी सासरवाडीला आलेल्या टकारिया-वाक्कर कुटुंबावर या दुर्घटनेने दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg