loader
Breaking News
Breaking News
Foto

गणेश भक्तांच्या परतीच्या प्रवासासाठी ना. योगेशदादा कदम यांच्याकडून विशेष मोफत मेमू रेल्वे सेवा

खेड (प्रतिनिधी) : गणेशोत्सवासाठी खेड, दापोली व मंडणगड परिसरात आलेल्या लाखो गणेश भक्तांचा परतीचा प्रवास सुखकर, सुरक्षित आणि सोयीचा व्हावा यासाठी राज्याचे गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्या पुढाकाराने सोमवार, दि. २१ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ४.०० वाजता मोफत गणपती विशेष मेमू रेल्वे सोडण्यात आली. कोकणातील गणेशोत्सव हा श्रद्धा, परंपरा आणि भावनेचा उत्सव आहे. गावी आलेल्या चाकरमान्यांना परतीच्या प्रवासात गैरसोय होऊ नये, गर्दीचा त्रास कमी व्हावा आणि प्रवास अधिक सुरक्षित व्हावा, या उद्देशाने ही विशेष सेवा उपलब्ध करून देण्यात आली. या सेवेमुळे गणेश भक्तांमध्ये समाधानाचे वातावरण होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या उपक्रमाबद्दल गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांचे सर्व गणेश भक्त व नागरिकांनी आभार मानले. या विशेष मेमू रेल्वेच्या निमित्ताने खेड रेल्वे स्थानकावर शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, रिक्षा सेना, युवासेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जि.प. सदस्य तथा तालुकाप्रमुख सचिन धाडवे, शहरप्रमुख कुंदन सातपुते, उपनगराध्यक्ष सतीश उर्फ पप्पूशेठ चिकणे, नगरसेवक प्रेमल चिखले, माजी नगरसेवक अंकुश विचारे, संदीप धाडवे, राजेंद्र चाळके, युवासेना तालुकाप्रमुख मिलिंद काते, प्रसाद पाटणे, राहुल शिंदे, शुकलेंद्र काते, पराग बांदिवडेकर, मानस उपावले, रिक्षा सेना अध्यक्ष नील गुहागरकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg