loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा येथील उद्योजक विकास शेट्ये यांचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव; घरीच तलावात केले बाप्पाचे विसर्जन!

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - निसर्गाचे प्रदूषण टाळण्यासाठी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी लांजा शहरातील उद्योजक विकास शेट्ये यांनीही गणेशोत्सव अत्यंत पर्यावरणपूरक (इकोफ्रेंडली) पद्धतीने साजरा केला. त्यांनी आपल्या घरगुती गणपतीचे विसर्जन कोणत्याही सार्वजनिक नदी किंवा विहिरीत न करता, घरच्या घरीच तयार केलेल्या कृत्रिम तलावात केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सध्याच्या काळात सण-उत्सव साजरे करताना पर्यावरणाची होणारी हानी टाळणे अत्यंत गरजेचे झाले आहे. हीच सामाजिक जबाबदारी ओळखून विकास शेट्ये आणि त्यांच्या परिवाराने गणेशोत्सवात विशेष काळजी घेतली होती. त्यांच्या घरच्या श्रींमूर्तीची संपूर्ण सजावट (मखर आणि डेकोरेशन) ही पूर्णपणे इकोफ्रेंडली म्हणजेच कागद, फुले आणि नैसर्गिक घटकांचा वापर करून करण्यात आली होती. पर्यावरणपूरक संवर्धनाचा संदेश देणारी ही सजावट नागरिकांचे लक्ष वेधून घेत होती. उत्सवाची सांगता करताना, बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी त्यांनी घराच्या परिसरातच एका सुंदर तलावाची (कृत्रिम हौदाची) व्यवस्था केली होती.

टाईम्स स्पेशल

वाजत-गाजत आणि भावपूर्ण वातावरणात या घरगुती तलावातच बाप्पाला निरोप देण्यात आला. नदी जलस्रोतांचे प्रदूषण रोखणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आपण उत्सव साजरे करताना निसर्गाचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली पाहीजे. याच भावनेतून आम्ही संपुर्ण सजावट पर्यावरणपूरक केली आणि घरच्या घरी तलावात बाप्पाचे विसर्जन गेली चार वर्ष करीत असल्याची प्रतिक्रिया उद्योजक विकास शेट्ये यांनी दिली. शेट्ये यांच्या पर्यावरणपूरक उपक्रमाचे लांजा शहरात मित्रपरिवारात भरभरून कौतुक होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg