loader
Breaking News
Breaking News
Foto

शृंगारतळी येथे सामुदायिक आरोग्य तपासणी शिबिर

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील श्री शृंगारतळीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव शृंगारतळी बाजारपेठ येथे "श्री गणेशा आरोग्याचा आरोग्य अभियान २०२६" कालावधी १४ सप्टेंबर ते २४ सप्टेंबर या कालावधीमध्ये सामुदायिक आरोग्य तपासणी शिबिर प्राथमिक आरोग्य केंद्र चिखली ता. गुहागर आयोजित करण्यात आले असून या तपासणी शिबिराचा अनेक रुग्णांनी शेकडो लाभ घेतला आहे. या शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टरांकडून रोग निदान, शिबिरानंतर आवश्यक शस्त्रक्रिया, रक्त व इतर तपासणी करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या शिबिरामध्ये गुहागर तालुक्यातील चिखली प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ रोहित इंगळे, तळवळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.धनश्री साळवी, प्रफुल कांबळे, आबलोली प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. तेजल मोहिते, डॉ.प्रसीष पांडे, हेदवी प्राथमिक आरोग्य केंद्रचे डॉ. कौशल्य वेल्हाळ , डॉ. चंद्रकांत कदम,कोळवळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. प्रणाली जाधव यांनी तसेच डॉ.सीमा जाधव, डॉ.गीता कराड, डॉ. हर्षल पावरा हे या शिबिरामध्ये रुग्णांची आरोग्य तपासणी करत आहेत. या शिबिरासाठी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य कर्मचारी, आशा सेविका यांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे.

टाईम्स स्पेशल

या शिबिरामध्ये आभा कार्ड व आयुष्यमान कार्ड काढून मिळणार आहे. या शिबिरासाठी श्री शृंगारतळीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव शृंगारतळी बाजारपेठचे अध्यक्ष अरुण शेठ गांधी, उपाध्यक्ष रुपेश भोसले, सचिव मयूर भोसले, खजिनदार तानाजी चव्हाण, सल्लागार सचिन कोंडविलकर व इतर सर्व कार्यकर्ते मेहनत घेत आहेत. या शिबिराचा गुहागर तालुक्यातील सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg