loader
Breaking News
Breaking News
Foto

गणेशोत्सव आरती संग्रहाचे भव्य प्रकाशन सोहळा

खेड - भक्ती, संस्कृती आणि परंपरेचा सुंदर संगम असलेल्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने युवासेना जिल्हाप्रमुख दर्शन महाजन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या “गणेशोत्सव आरती संग्रह” पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा रामदासभाई कदम व जि. प. सदस्य अण्णा कदम यांच्या शुभहस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गणेशोत्सव हा केवळ उत्सव नसून आपल्या संस्कृतीशी, परंपरेशी आणि श्रद्धेशी जोडलेला एक जिव्हाळ्याचा सोहळा आहे. या भावनेतून गणेशभक्तांना विविध पारंपरिक आरत्या सहज उपलब्ध व्हाव्यात आणि आपल्या पुढील पिढीपर्यंत भक्ती व संस्कृतीचा हा समृद्ध वारसा पोहोचावा, या उद्देशाने आरती संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.

टाईम्स स्पेशल

यावेळी उद्योजक शैलेशशेठ कदम, महिला शहर संघटिका नेहा दळी, सिद्धेश खेडेकर, उद्योजक निरंजन दळी, शुकलेंद्र काते, प्रथमेश दरेकर, नूतन सावंत, साईराज साळवी, अरफात सुर्वे, मानस उपावले, नील गुहागरकर तसेच शिवसेना, युवासेना, महिला आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमाच्या माध्यमातून “भक्ती जपूया… संस्कृती जपूया… परंपरेचा वारसा पुढे नेऊया!” हा सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg