loader
Breaking News
Breaking News
Foto

श्री गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी सावंतवाडी बाजारपेठेत तुफान गर्दी

सावंतवाडी (प्रतिनिधी): श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहरात खरेदीसाठी भाविकांची तुफान गर्दी झाली असून मुख्य बाजारपेठ श्री गणेश चतुर्थी सणाच्या निमित्ताने माठीच्या सामानासह विविध रानभाज्यांनी फुलून गेली आहे. ग्रामीण भागातून आलेल्या सुमारे ३०० हून अधिक स्थानिक विक्रेत्यांमुळे बाजारपेठेला जत्रेचे स्वरूप आले असून, या हंगामी व्यवसायामुळे शेतकरी व कष्टकर्‍यांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होत आहे. कोकणात गौरी-गणपतीचा सण अत्यंत उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. या सणासाठी नोकरीनिमित्त शहरात गेलेले चाकरमानी मोठ्या संख्येने आपापल्या गावी दाखल झाले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

श्री गणेशाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर मूर्तीवर माठी बांधली जाते. ही नैसर्गिक साहित्यापासून ’माठी’ (माटोळी) बांधण्याची जुनी परंपरा आहे. या माटोळीसाठी जंगलातील विविध फळे, फुले आणि आंब्याचा टाळ वापरला जातो. ग्रामीण भागातील शेतकरी व ग्रामस्थ गुरांना चरायला घेऊन जाताना किंवा विशेष प्रयत्नाने जंगलातून हे माठीचे सामान गोळा करतात. यामध्ये नारळ, काकडी, कवंडाळा, श्रीफळ, सुपारी, शेरवाडा आणि हरणाची फुले यांसारख्या दुर्मिळ रानफळांचा आणि रानफुलांचा समावेश असतो.

टाईम्स स्पेशल

सावंतवाडीच्या बाजारपेठेत आज सकाळपासूनच ग्रामीण भागातील विक्रेते हे सामान घेऊन दाखल झाले आहेत. गणेशभक्तांकडून या पारंपरिक साहित्याला मोठी मागणी असून, खरेदीसाठी बाजारात गर्दी होत आहे. एका बाजूला सणाचा उत्साह द्विगुणित होत असतानाच, दुसर्‍या बाजूला स्थानिक शेतकरी व गरिबांना या चार दिवसांच्या व्यवसायातून चांगला आर्थिक दिलासा मिळत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg