संगमेश्वर (सत्यवान विचारे) - मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर संगमेश्वर तालुक्यात बुधवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांत तिघेजण जखमी झाले. आंबेड बुद्रुक येथे ड्रीम युगा मोटारसायकल (एमएच ०८ एबी ४०६४) घेऊन अनिकेत प्रमोद मनवे (२१) हा पाठीमागे कल्पेश नामदेव मनवे (२३) याला घेऊन रत्नागिरीहून उजगावच्या दिशेने जात होता. आंबेड बुद्रुक परिसरात चालकाच्या डोळ्यावर झापड आल्याने दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर दुचाकी रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या खड्ड्यात जाऊन अपघात झाला. या अपघातात अनिकेत यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तर कल्पेश यांच्या उजव्या हाताला फ्रॅक्चर झाले. दोघांनाही तातडीने संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
तर पैसाफंड हायस्कूलसमोरील पुलावर १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे ४.२० वाजता रिक्षा आणि इर्टिगा कारची धडक झाली. कपिल प्रकाश शिरसेकर (४१, रा. कोकणनगर, रत्नागिरी) हे रिक्षा (एमएच ०८ बीसी ०७०७) घेऊन सावर्डेहून रत्नागिरीच्या दिशेने प्रवासी घेऊन जात होते. यावेळी इर्टिगा कार (एमएच ४७ एव्हाय १६३४) चालक राम प्रकाश लाल (४०) याने रस्त्याची परिस्थिती लक्षात न घेता वाहन वेगाने चालवून रिक्षाला पाठीमागून धडक दिल्याचे पोलिसांत दाखल फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या धडकेत रिक्षाच्या मागील उजव्या बाजूचे नुकसान झाले असून, रिक्षाचालक कपिल शिरसेकर यांना किरकोळ दुखापत झाली.
या प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. १३०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २८१, १२५ (अ) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ व्ही. व्ही. मनवल करीत आहेत. महामार्गावरील दोन वेगवेगळ्या अपघातांमुळे मुंबई - गोवा महामार्गावरील वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.









































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.