सावंतवाडी ( प्रतिनिधी ) : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, कोनशी येथील विद्यार्थ्यांनी ‘आनंददायी शनिवार’ उपक्रमांतर्गत शाडूच्या मातीपासून आकर्षक गणेशमूर्ती तयार करून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश दिला. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या मार्गदर्शनानुसार आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये हस्तकला, स्थानिक कौशल्य, पर्यावरणस्नेही दृष्टिकोन, सृजनशीलता तसेच सांस्कृतिक मूल्यांची जपणूक व्हावी, या उद्देशाने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच अनुषंगाने कोनशी शाळेतील विद्यार्थ्यांनी परिसरातील लक्ष्मण गवस (आप्पा), मनोहर काका आणि दुर्गाराम जोशी यांच्या गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळांना भेट दिली.
या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी गणेशमूर्ती तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी शाडूची माती, मूर्ती घडविण्याची पद्धत, विविध आकार देण्याचे तंत्र आणि रंगकामासह मूर्ती सजावटीची प्रक्रिया यांची प्रत्यक्ष माहिती घेतली. स्थानिक मूर्तिकारांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून मूर्ती निर्मितीचे प्रात्यक्षिकही दाखविले.कार्यशाळेतील अनुभवाच्या आधारे विद्यार्थ्यांनी शाळेत स्वतः शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती तयार केल्या. विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने आणि कल्पकतेने मूर्ती साकारत आपल्या कलागुणांना वाव दिला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना केवळ गणेशमूर्ती निर्मितीचे कौशल्य मिळाले नाही, तर ‘मातीपासून निर्मिती आणि निसर्गातच विसर्जन’ या पर्यावरणपूरक विचाराची जाणीवही झाली.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता, कलाकौशल्य, निरीक्षणशक्ती, श्रमप्रतिष्ठा, स्थानिक कलाविष्काराबद्दल आदर, पारंपरिक सांस्कृतिक सण-उत्सवांचे संवर्धन आणि पर्यावरण संवर्धनाची भावना विकसित होण्यास मदत झाली. पारंपरिक कला व स्थानिक कौशल्ये विद्यार्थ्यांपर्यंत प्रत्यक्ष अनुभवातून पोहोचविण्याचा हा उपक्रम विशेष ठरला. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे शाळा व्यवस्थापन, पालक व ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले. आनंददायी शनिवारच्या माध्यमातून ‘शिकणे म्हणजे केवळ पुस्तकातील ज्ञान नव्हे, तर प्रत्यक्ष अनुभवातून कौशल्य आणि मूल्यांची निर्मिती’ हा संदेश या उपक्रमातून अधोरेखित झाला. या उपक्रमासाठी तांबुळी केंद्रप्रमुख श्रीम ज्योत्स्ना देसाई, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री सौरभ सिध्दये, उपाध्यक्ष श्री सिद्धेश गवस आणि सर्व पालक यांचे मार्गदर्शन लाभले. या उपक्रमाचे आयोजन व यशस्वीरित्या अंमलबजावणीसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री बाबुराव पास्ते, पदवीधर शिक्षक डॅा. राजेंद्र चव्हाण, उपशिक्षिका श्रीम स्वाती देसाई यांनी विशेष परिश्रम घेतले.









































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.