रत्नागिरी - प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था संचलित मानेज इंटरनॅशनल स्कूल शाळेत पर्यावरणपूरक शाडू माती गणपती मूर्ती बनवणे स्पर्धा व मोदक पाककृती स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. ह्या स्पर्धा पालक व त्यांचे पाल्य यांच्यासाठी भरविण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांना प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीमुळे होणार्या जलप्रदूषणाची माहिती देऊन पर्यावरणपूरक उत्सवाचे महत्त्व पटवून देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. या स्पर्धेमध्ये पालकांनी आपल्या पाल्यांसह उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसह शाडू मातीपासून अतिशय सुंदर व आकर्षक गणेश मूर्ती साकारल्या व त्याचबरोबर पारंपारिक उकडीच्या मोदकांची सजावट केली.
गणपती मूर्ती बनवणे स्पर्धेमध्ये नभा वैद्य व पालक दीपक वैद्य, शर्विल पाटील व पालक सागर पाटील, शिवराज रणसे व पालक स्नेहल रणसे यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. या स्पर्धेचे परीक्षण मुख्याध्यापिका सुमन अरोरा, आरुषी गावडे, गौरी कोल्हटकर आणि सई साने यांनी केले. मोदक सजावट स्पर्धेमध्ये रित्विक घोष व पालक तिथी घोष, शिवराज रणसे व पालक स्नेहल रणसे, विरेन भोळे व पालक सोनम भोळे हे अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले. या स्पर्धेचे परीक्षण मुख्याध्यापिका सुमन अरोरा, गौरी कोल्हटकर, साने व शाळेचे कलाशिक्षक रोहित नवेले यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पारिजात वाघाटे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले. शाळेच्या मुख्याध्यापिका सुमन अरोरा यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यशस्वी विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे शाळेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रद्युम्न माने व शाळेच्या व्यवस्थापिका ईशानी माने यांनी अभिनंदन केले.









































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.