loader
Breaking News
Breaking News
Foto

श्री रामेश्वर विद्यालय कोंडगेच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर)श्री रामेश्वर विद्यालययाच्या आणि संस्थेच्या हितासाठी नावेरी परिसर शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई कोंडगे ,कुरंग ,झर्ये .संचलित .श्री रामेश्वर विद्यालय कोंडगे येथे माजी विद्यार्थी स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. यावेळी सुरुवातीला संस्थेचे सीईओ एकनाथजी विश्वासराव . मौजे कोंडगेचे अध्यक्ष अशोकजी काटकर सुधाकर बेर्डे ज्ञानगंगा वाचनालयाचे अध्यक्ष के . व्हि चव्हाण या सर्वांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन व सरस्वती मातेच्या मूर्तिला व सावीत्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली . त्यानंतर संस्था पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यानंतर माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यामध्ये १९८० दशकातील सर्वात्मका शिवसुंदरा .... या प्रार्थनेचे गायन करण्यात आले .यावेळी अनिल कदम यांनी मेळाव्याचे प्रास्ताविक करताना . माजी विद्यार्थी संघटनेची गरज . जीआर शाळेची स्थितीं . येऊ घातलेली आव्हाने याची माहिती सर्वांना दिली . आपल्या शाळेच्या पहिल्या बॅचचे माजी विद्यार्थी व गटविकास अधिकारी पदावरून निवृत्त झालेले जयेंद्रजी जाधव यांनी खुप छान मार्गदर्शन केले व येत्या ऑक्टोंबर महिन्यात मुंबई या ठिकाणी माजी विद्यार्थी मेळावा घेऊन माजी विद्यार्थी संघटना स्थापन करून पुढील योजना आखाव्यात हे सुचीत केले .शुभम नाटेकर यांनीही मौलीक मार्गदर्शन केले सदर मेळाव्याला माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभा झाले होते यावेळी सकारात्मक चर्चा झाली.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg