loader
Breaking News
Breaking News
Foto

कै. बाळकृष्ण शिवराम शिंदे कमानीचे भूमिपूजन संपन्न!

खेड / जामगे : शिवसेना नेते तथा माजी मंत्री श्री. रामदासभाई कदम यांच्या संकल्पनेतून खेड तालुक्यातील जामगे शिंदेवाडी येथे समाजसेवक कै. बाळकृष्ण शिवराम शिंदे यांच्या नावे उभारण्यात येणाऱ्या भव्य कमानीचे भूमिपूजन महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार श्री. योगेशदादा कदम यांच्या शुभहस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.समाजसेवक कै. बाळकृष्ण शिवराम शिंदे यांच्या सामाजिक कार्याच्या स्मृतींना अभिवादन करणारा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्याचा आणि सामाजिक योगदानाचा गौरव पुढील पिढ्यांसाठी सदैव प्रेरणादायी ठरेल, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या भूमिपूजन सोहळ्यास जिल्हा परिषद सदस्य श्री. अरुण उर्फ आण्णा कदम, उद्योजक श्री. शैलेशशेठ कदम, जामगे शाखाप्रमुख श्री. शंकर शिंदे, श्री. पांडुरंग शिंदे, माजी उपसरपंच श्री. राजेंद्र जंगम, श्री. संतोष जाधव, श्री. प्रवीण साळवी, श्री. निलेश जंगम, श्री. जनार्दन पवार, श्री. प्रमोद पवार, श्री. फुलाजी साळवी, कुमार संदेश गुंदेकर, श्री. नितीन मोहिते, श्री. अनिल शिंदे, श्री. सागर शिंदे, कुमार स्वराज शिंदे, कुमार वीर साळवी, श्री. विनोद जंगम, श्री. विठोबा पवार यांच्यासह ग्रामस्थ, पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg