loader
Breaking News
Breaking News
Foto

आमदार दीपक केसरकर बाप्पाच्या चरणी नतमस्तक, जनतेच्या कल्याणासाठी प्रार्थना

सावंतवाडी: माजी शिक्षणमंत्री, विद्यमान आमदार दीपक केसरकर यांनी गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात बाप्पाच्या चरणी नतमस्तक होत राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी प्रार्थना केली आहे. आमदार केसरकर यांनी सावंतवाडीतील आपल्या घरी सपत्नीक गणपतीचे पूजन केले. महाराष्ट्रात शांतता नांदावी आणि सर्व जनता सुखी रहावी अशी प्रार्थना करतानाच त्यांनी मराठवाड्यातील भीषण दुष्काळावरही चिंता व्यक्त केली. मराठवाड्यातील जनतेवरचे दुष्काळच संकट लवकरात लवकर दूर व्हावं, अशी याचना त्यांनी बापाकडे केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी केसरकर यांनी विशेष साकडे घातले असून, स्थानिक तरुणांना चांगल्या रोजगाराच्या संधी मिळाव्यात, फलोद्यान, मच्छीमारांच्या जीवनात समृद्धी यावी आणि सिंधुदुर्ग जिल्हा देशातील सर्वोत्कृष्ट पर्यटन जिल्हा म्हणून नावारूपाला यावा, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली. आपल्या पदाचा उपयोग जनसेवेसाठी व्हावा आणि चार वेळा निवडून देणाऱ्या मतदारांची सेवा करण्यासाठी बाप्पाने ताकद द्यावी अशी प्रार्थना केसरकर यांनी केली आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg